Join us   

कॅल्शियम पाहिजे पण दूध नको? डॉक्टर सांगतात रोज खा १ चमचा पांढरे तीळ, हाडांना येईल बळकटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 1:38 PM

Eat White Sesame Seeds To Beat Calcium And Vitamin D Deficiency : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॅल्शियमसाठी तुम्हाला भरपूर औषधं घेण्याची गरज नाही तुम्ही पांढऱ्या तिळाचे सेवन करू शकता.

कॅल्शियम आणि  व्हिटामीन डी हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असते.  भारत हा सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश आहे. तरीसुद्धा अनेकांना कॅल्शियमच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. (Health Tips) कॅल्शियमची कमतरता भासल्यास हाडं वेळेआधीच कमकुवत होऊ शकतात. बरेचजण डेअरी उत्पादनं किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करत नाही. (According To Ayurveda Dr Eat White Sesame Seeds To Beat Calcium And Vitamin D Deficiency)

NCBI वर प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार भारतात सुर्याची किरणं भरपूर प्रमाणात पडत असली तरी जवळपास ८५ टक्के भारतीय लोकांमध्ये व्हिटामीन डी ची कमतरता उद्भवते. कॅल्शियमची व्हिटामीन डी च्या कमतरतेचं कारण ठरू शकते. 

कॅल्शियमची कमतरता कशी पूर्ण करावी?

असं मानलं जातं की दूध किंवा डेअरी उत्पादनांमध्ये कॅल्शियम सगळ्यात जास्त मिळतं. आयुर्वेद डॉक्टर इरफान यांनी कॅल्शियमचा आयुर्वेदीक फॉर्म्यूला सांगितला आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होणार नाही. 

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास काय कराल? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, पोटदुखी थांबेल

पांढरे तीळ कॅल्शियमचा भंडार आहेत

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॅल्शियमसाठी तुम्हाला भरपूर औषधं घेण्याची गरज नाही तुम्ही पांढऱ्या तिळाचे सेवन करू शकता. हे तीळ तुम्हाला बाजारात सहज मिळतील. २०० ग्राम पांढऱ्या तिळात रोजच्या गरजेइतकं कॅल्शियम मिळू शकतं. बाजारात मिळणाऱ्या कॅल्शियमच्या औषधांच्या तुलनेत तिळाचे सेवन उत्तम ठरते. यामुळे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही.

पांढऱ्या तिळाचा वापर कसा करावा

२०० ग्राम तिळ आणून तव्यावर व्यवस्थित भाजून घ्या. थंड झाल्यानंतर याची पावडर बनवून एका डब्ब्यात काढून ठेवा. हाडांना जास्तीत जास्त कॅल्शियम देण्यासाठी १ ग्लास दूध व्यवस्थित उकळवून घ्या. एक ग्लास दूधात एक चमचा तीळाची पावडर घालून सकाळ-संध्याकाळ प्या. डॉक्टर सांगतात की १० वर्षवयोगट ते ३५ वर्षवयोगटातील लोक याचे सेवन करू शकता. ज्यामुळे शरीराचा कमकुवतपणा दूर होतो. याव्यतिरिक्त वयस्कर लोकही याचे सेवन करू शकतात. 

कॅल्शियमची कमतरता भासल्यास काय परिणाम होतो

हाडं कमकुवत होणं, ऑस्टिओपोरोसिस, रिकेट्स, मांसपेशींमध्ये वेदना, थकवा आणि कमकुवतपणा, दातांच्या समस्या, एक्जिमा, मूड संबंधित विकार.

शरीराला रोज किती कॅल्शियमची आवश्यकता असते

 ६ महिने ते १ वर्षाचे मूलं :४०० मिलीग्राम, 

१ ते ३ वर्ष :  ६०० मिलीग्राम

४  ते ८ वर्ष :  ६०० मिलीग्राम

९ ते १८ वर्ष  : १२०० मिलीग्राम

१९ ते ५० वर्ष : १००० मिलीग्राम

गर्भवती आणि स्तनपान  करणाऱ्या महिला १३०० मिलीग्राम

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल