Join us   

गुडघे दुखतात-अंगात त्राण नाही? २०६ हाडांना कॅल्शियम देतील हे ५ पदार्थ; रोज खा-ताकद येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 12:50 PM

5 Winter Fruits Increase Calcium And Vitamin in Your Bone : सुक्या, ताज्या अंजिरमध्ये कॅल्शियम भरपूर असते. हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्यासाठी आणि हाडांना मजबूती देण्यासाठी  अंजीर खायला हवेत.

हिवाळा सुरू झाला असून वातावरणात गारवा  जाणवत आहे. थंडीच्या दिवसांत ऊन कमी पडत असल्यामुळे शरीराला पुरेपूर व्हिटामीन डी (Vitamin-D) मिळू शकत नाही. कॅल्शियम आणि व्हिटामीन डी हाडांच्या मजबूतीसाठी फार महत्वाचे असते. कॅल्शियम आणि व्हिटामीन डी  हाडांची डेंसिटी वाढवून ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांपासून बचाव करते. मांसपेशींची ताकद वाढते आणि शरीराचे कामकाज चांगले राहण्यासही मदत होते. (According To Dietician Include These 5 Winter Fruits In Diet To Increase Calcium And Vitamin in Your Bone)

ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत  नाहीत. हॉर्मोन्स एंजाईम्सचा  स्त्राव नियंत्रणात राहतो. रोजच्या आहारात फळांचा समावेश करून तुम्ही हाडं मजबूत बनवू शकता. डिटॉक्स प्रि च्या फाऊंडर, पोषणतज्ज्ञ  प्रियांशी भटनागर यांच्यामते हिवाळ्याच्या ४ महिन्यात कॅल्शियम रिच पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. (Foods For Bones)

१) पेरू

मेडीसिन नेटच्या रिपोर्टनुसार  पेरूमध्ये कॅल्शियम आणि व्हिटामीन सी दोन्ही चांगल्या प्रमाणात असते ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. शरीरासाठी पेरू फायदेशीर ठरतात. १०० ग्राम पेरूमध्ये जवळपासस १८ मिलीग्राम कॅल्शियम असते. यात व्हिटामीन सी, लायकोपिन, एंटीऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे इम्यूनिटी वाढवण्यास  मदत होते. यातील फॉलिक एसिड गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरते. 

२) खजूर

खजूर कॅल्शियम आणि अन्य खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि हाडं मजबूत राहण्यास मदत होते. १०० ग्राम मध्ये जवळपास ६४ मिलिग्राम कॅल्शियम असते. तुम्ही सफरचंद, केळी ही फळंसुद्धा खाऊ शकता.

३) किव्ही

किव्हीमध्ये कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व असतात. ज्यामुळे इम्यून सिस्टिम मजबूत राहण्यास मदत होते  आणि हाडांना फायदा होतो. १०० ग्राम किव्हीमध्ये जवळपास   ३४ मिलीग्राम कॅल्शियम  असते.

४) अंजीर

सुक्या, ताज्या अंजिरमध्ये कॅल्शियम भरपूर असते. हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्यासाठी आणि हाडांना मजबूती देण्यासाठी  अंजीर खायला हवेत. १०० ग्राम सुक्या अंजिरमध्ये जवळपास १६२ मिलीग्राम कॅल्शियम असते.  तर १०० ग्राम ताज्या अंजिरमध्ये ३५ मिलीग्राम कॅल्शियम असते.

५) संत्री

संत्र्यात व्हिटामीन सी बरोबरच कॅल्शियमसुद्धा असते. संत्र्याचा रस प्यायल्यानं शरीराला कॅल्शियम मिळते आणि इम्यूनिटी चांगली राहते. १०० ग्राम संत्र्यात जवळपास ४० मिलीग्राम कॅल्शियम असते. यात व्हिटामीन्स, फायबर्स आणि एंटी ऑक्सिडेंट्ससुद्धा असतात

टॅग्स : आरोग्यफिटनेस टिप्स