Join us   

वाढदिवसाला केक, पेस्ट्री खाणं महागात पडू शकतं! FSSAI ने सांगितला कॅन्सरचा धोका- 'हे' केक खाणं टाळाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 2:01 PM

Health Tips: वाढदिवसाला आनंदाने केक, पेस्ट्री खाणं किती महागात पडू शकतं, याविषयी बघा FSSAI ने दिलेला हा इशारा...(according to FSSAI 12 out of 235 cake samples in Karnataka contained cancer-causing dyes)

ठळक मुद्दे इथून पुढे केक खाताना खूप काळजी घेतली पाहिजे. ते सॅम्पल बंगरुळ शहरातले आहेत, त्यामुळे आपल्याला त्याचा धोका नाही, असा विचार करू नका.

हल्ली केक खाणं हे फक्त वाढदिवसापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. कारण कोणतंही सेलिब्रेशन असलं तरी हमखास केक कापलाच जातो. केक नसेल तर पेस्ट्री तरी असतेच. बऱ्याचदा तर लहान मुलांना किंवा मोठ्या मंडळींनाही केक खावासा वाटला तर हमखास लहानशी पेस्ट्री मागवली जाते. पण असं वारंवार केक, पेस्ट्री खाणं तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं, याविषयीचा खुलासा नुकताच फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI ने दिला आहे. (according to FSSAI 12 out of 235 cake samples in Karnataka contained cancer-causing dyes)

 

FSSAI ने केक आणि त्यामधील घटक याविषयी नुकतीच एक पाहणी केली. त्याअंतर्गत बंगळुर येथील जवळपास २३५ ठिकाणांहून वेगवेगळ्या केकचे सॅम्पल मागविण्यात आले होते.

उपवास करुन खूप थकवा आला? भरपूर एनर्जी देणारा 'हे' सुपरहेल्दी ज्यूस प्या! येईल झटपट ताकद

त्या पाहणीत असं दिसून आलं की २३५ पैकी तब्बल १२ नमुन्यांमध्ये कार्सिनोजेनिक घटक त्यांच्या ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा खूप जास्त प्रमाणात आढळून आले. हे घटक कॅन्सरचा धोका वाढविणारे असतात. शिवाय त्या घटकांमुळे दमा, अस्थमा, ॲलर्जिक आजारही होऊ शकतात, असंही तज्ज्ञ सांगतात.

 

या घटनेच्या अनुशंगाने डॉक्टरांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये ते सांगतात की इथून पुढे केक खाताना खूप काळजी घेतली पाहिजे. ते सॅम्पल बंगरुळ शहरातले आहेत, त्यामुळे आपल्याला त्याचा धोका नाही, असा विचार करू नका.

बसून बसून पायाचा घोटा आखडून जातो- चालताना दुखतो? भाग्यश्री सांगते पायांना मजबुती देणारे ५ व्यायाम

वाढदिवसासाठी किंवा कोणत्याही सेलिब्रेशनसाठी केक निवडताना तो शक्यतो आयसिंग केलेला नसावा. कारण आयसिंग करण्यासाठी जे चमकदार रंग वापरले जातात, ते आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरतात. त्यामुळे शक्यतो प्लेन केक खाण्यास प्राधान्य द्या. खूप डार्क रंग असणारे केक खाणं टाळा. शक्यतो होममेड केक खाण्यास प्राधान्य द्या... आनंद जरूर साजरा करा, पण त्यासाठी केक कापणं खरोखर गरजेचं आहे का हे एकदा तपासून पाहा...

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सकर्करोग