भारतीय खाद्यपदार्थांमध्ये तूप आणि तेलाचा वापर सर्वाधिक केला जातो. FSSAI च्या रिपोर्टनुसार शरीरासाठी या तेलाचा वापर फायदेशीर असून याचा अतिवापर केल्याने नॉन कम्युनिकेबल आजार वाढण्याचा धोका असतो. अनेकजणांच्या घरात तेलात हात बुडतील इतकं तेल भाजीत किंवा कोणत्याही पदार्थात घातलं जातं. जास्त तेल खाल्ल्याने गंभीर आजार उद्भवू शकतात. (Tips For Consuming Cooking Oils Healthy)
FSSAI च्या रिपोर्टनुसार जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्टेरॉल आणि हृदयाचे इतर विकार उद्भवू शकतात. बॅलेंस डाएटचा आहारात समावेश करा. ज्यात २० ते २५ टक्के कॅलरीजयुक्त फॅट आणि तेलाचा समावेश असेल. एकाचवेळी जास्त प्रमाणात तेल किंवा तुपाची खरेदी करू नका. कारण महिन्याला जितकं लागतं त्यापेक्षा जास्त तेल किंवा तूप आणूण ठेवलं तर तुम्ही जास्त प्रमाणात याचे सेवन कराल. (Cooking Oil Guide Everything You Should Know)
1) किचनमध्ये रोजच्या वापरण्याच्या भांड्यात एकत्र सर्व तेल भरू नका. रोज किती प्रमाणात तेल वापरत आहात याकडे लक्ष द्या. रोजच्या खाण्यात तेलाचे प्रमाण हळू हळू कमी करा. डिप फ्राईड पदार्था खाण्यापेक्षा कमी तेलात परतवलेले पदार्थ खा.
२) जेवण करताना छोट्या चमच्याचा वापर करा. उकळलेले, वाफवलेले पदार्थ जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. FSSI च्या सल्ल्यानुसार अधिक तळलेलं खाण्यापेक्षा उकळलेलं आणि वाफेवर शिजवलेले पदार्थ किंवा ग्रिल्ड पदार्थ खा.
३) तेल वारंवार गरम केल्यामुळे त्याची गुणवत्ता खराब होते. तेल पुन्हा गरम केल्यामुळे त्यात फ्री रॅडिक्स तयार होतात. ज्यामुळे पदार्थाची चवही बिघडू शकते.
४) जेवण बनण्याचं तेल म्हणजेच खाद्य तेल चांगल्या गुणवत्तेचं असेल तर जवळपास १ वर्ष चांगले चालते. यासाठी कोरड्या आणि चांगल्या जागेवर झाकून तेल साठवून ठेवा.
सकाळी भाजलेल्या लसणाची १ पाकळी खा; कोलेस्टेरॉल बाहेर निघेल-म्हातारपणातही निरोही राहाल
५) भारतात जेवण गरम करण्यासाठी नारळाचे तेल उत्तम मानले जाते. मोहोरीचे तेल, शेंगदाण्याचे तेल, शुद्ध देशी तूपाचा वापर तुम्ही करू शकता. सॅलेड किंवा इतर भाज्यांमध्ये हलकं गरम करून तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
६) एक्सपर्ट्सच्या मते ऑलिव्ह ऑईल, कॅनोला ऑईल, मोहोरीचे तेल, सोयाबीन, सनफ्लॉवर तेल, राईस ब्रेन तेल फायदेशीर ठरते. इंडियन कुकींगच्या हिशोबाने हे तेल उत्तम ठरते.
रोज फक्त १ लाडू खा; वाढलेली शुगर कंट्रोलमध्ये येईल; घरगुती 'एंटी डायबिटीक' लाडूंची खास रेसिपी
7) उच्च तापमानावर गरम केलेल तेल पुन्हा पुन्हा वापरू नये. कारण यातून विषारी धूरयुक्त पदार्थ बाहेर निघतात. अशा तेलाचा पुन्हा वापर केल्यामुळे तब्येतीवर गंभीर परिणाम होतो.