Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वाढलेलं कोलेस्टेरॉल खरंच तुळशीची पानं खाल्ल्यानं कमी होतं का? काय सांगतात अभ्यास?

वाढलेलं कोलेस्टेरॉल खरंच तुळशीची पानं खाल्ल्यानं कमी होतं का? काय सांगतात अभ्यास?

Cholesterol Control Tips : वाढलेलं कोलेस्टेरॉल हा आजकाल अनेकांचा प्रश्न आहे, हेल्दी जीवनशैलीचा त्यासाठी विचार करायला हवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 12:02 PM2023-01-27T12:02:00+5:302023-01-27T14:48:15+5:30

Cholesterol Control Tips : वाढलेलं कोलेस्टेरॉल हा आजकाल अनेकांचा प्रश्न आहे, हेल्दी जीवनशैलीचा त्यासाठी विचार करायला हवा.

According to journal of functional foods study tulsi leaves extract can reduce bad cholesterol level | वाढलेलं कोलेस्टेरॉल खरंच तुळशीची पानं खाल्ल्यानं कमी होतं का? काय सांगतात अभ्यास?

वाढलेलं कोलेस्टेरॉल खरंच तुळशीची पानं खाल्ल्यानं कमी होतं का? काय सांगतात अभ्यास?

शरीरात कोलेस्टेरॉल वाढणं ही एक गंभीर समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोलेस्टेरॉल वाढल्यानं स्ट्रोक, हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. जगभरात जवळपास २.६ मिलियन  लोकांचा मृत्यू यामुळे होतो. कोलेस्टेरॉल कमी करण्याासाठी हाय फॅट्सयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. तुळशीची पानं तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होतील. तुळशीच्या पानांचा उपयोग करून तुम्ही शरीरातील घाणेरड्या नसांना उघडून कोलेस्टेरॉल बाहेर काढू शकता. (According to journal of functional foods study tulsi leaves extract can reduce bad  cholesterol level)

घाणेरडं कोलेस्टेरॉल बाहेर काढतात तुळशीची पानं

जर्नल ऑफ फंक्शनल फूडमध्ये प्रकाशित झालेल्या  २०१८ च्या अभ्यासात असं दिसून आलं की  तुळशीची पानं ४० किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये चयापचन संबंधी विकार कमी  करतात. यामुळे कोलेस्ट्रोल म्हणजेच एलडीएल कमी होण्यास मदत होते. 

भारतात तुळशीच्या पानांना आयुर्वेदीक जडीबुडींची  राणी मानलं जातं. यात अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे अनेक औषधांमध्ये  याचा अर्क वापरला जातो.  तुळस ही थोडी मसालेदार आणि कडवट जडीबुटी आहे.  तुळशीच्या पानांचा रसही तुम्ही घेऊ शकता. 

लग्नानंतर मुलीच्या पगारावर हक्क कोणाचा? तिचा स्वत:चा? सासरच्यांचा की माहेरच्यांचा?

iopscience.iop.org मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की तुळशीच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन सारख्या पॉलिफेनॉल संयुगे असतात, जे एकूण कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात आणि चरबीचे ऑक्सिडेशन रोखू शकतात, जे एथेरोस्क्लेरोसिससाठी जबाबदार आहे. (एथेरोस्क्लेरोसिस) हे सर्वात मोठे कारण आहे. एथेरोस्क्लेरोसिस म्हणजे धमनीच्या भिंतींमध्ये आणि त्यावरील चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर घातक पदार्थ जमा होतात.

संशोधकांनी हा अभ्यास उंदरांवर केला आणि अनेक आठवडे त्यांना तुळशीच्या पानांचा रस दिला. त्यांना असे आढळून आले की दिवसातून फक्त 20 ते 80 मिलीग्राम तुळशीचा रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. त्यांनी निष्कर्ष काढला की तुळशीचा रस फक्त 7 दिवस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.

Web Title: According to journal of functional foods study tulsi leaves extract can reduce bad cholesterol level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.