Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास- रात्रभर झोप नाही? ४ पैकी फक्त एक गोष्ट पाण्यात घालून प्या

ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास- रात्रभर झोप नाही? ४ पैकी फक्त एक गोष्ट पाण्यात घालून प्या

Acidity Problems? 4 Home Remedies That Can Help you : काहीही खाल्लं की लगेच पोट फुगतं, वारंवार आंबट ढेकर येतात; जेवणानंतर ४ प्रकारचे पेय पिऊन पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 06:39 PM2024-01-16T18:39:41+5:302024-01-16T21:00:56+5:30

Acidity Problems? 4 Home Remedies That Can Help you : काहीही खाल्लं की लगेच पोट फुगतं, वारंवार आंबट ढेकर येतात; जेवणानंतर ४ प्रकारचे पेय पिऊन पाहा..

Acidity Problems? 4 Home Remedies That Can Help you | ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास- रात्रभर झोप नाही? ४ पैकी फक्त एक गोष्ट पाण्यात घालून प्या

ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास- रात्रभर झोप नाही? ४ पैकी फक्त एक गोष्ट पाण्यात घालून प्या

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला जमत नाही. घाई गडबडीच्या जीवनात लोकं आपल्या आहारात जंक फूडचा जास्त प्रमाणात समावेश करताना दिसून येत आहे. ज्यामुळे वजन तर वाढतेच, यासह गंभीर आजार आणि पोटाचे विकारही वाढतात. मुख्य म्हणजे दररोज अॅसिडिटी, गॅसेस किंवा बद्धकोष्ठतेच्या त्रासाला सामोरे जावे लागते (Acidity Problem).

जास्त मसालेदार, आंबट आणि तळकट पदार्थ खाल्ल्याने हा त्रास वाढत जातो. ज्यामुळे सामान्य असलेला हा त्रास पुढे जाऊन गंभीर समस्येत रुपांतरीत होऊ शकते. जर आपण देखील पोटाचे विकार जसे की, अॅसिडिटी, गॅसेस किंवा बद्धकोष्ठतेच्या त्रासाला वैतागले असाल तर, आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य डॉ. सर्वेश कुमार यांनी शेअर केलेल्या उपायांना फॉलो करा(Acidity Problems? 4 Home Remedies That Can Help you).

कोमट पाणी

दिवसाची सुरुवात नेहमी कोमट पाण्याने करा. कोमट पाणी प्यायल्याने अॅसिडिटी कमी होते. शिवाय छातीत जळजळण्याचा त्रासही कमी होतो. आपण कोमट पाण्यात काळी मिरी पावडर किंवा लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता. यामुळे गॅसेसची समस्या दूर होईलच शिवाय वजन देखील आटोक्यात येईल.

साठीनंतरही संगीता दिसते फिट अँड ब्यूटीफुल, दुपारच्या जेवणात खाते बाजरीची भाकरी, वजन कमी करायचं तर..

बडीशेप पाणी

जेवणानंतर काही वेळाने बडीशेप खाल्ल्याने अॅसिडिटीपासून आराम मिळतो. आपण जेवल्यानंतर बडीशेप खाऊ शकता. उकळत्या पाण्यात घालून त्याचा चहा तयार करू शकता. जर आपल्याला अॅसिडिटीचा त्रास असेल तर, जेवणापूर्वी एक कप बडीशेपचा चहा तयार करून प्या.

जिऱ्याचे पाणी

जिऱ्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारे गुणधर्म आढळतात. जे अॅसिड रिफ्लक्स आणि गॅसेसपासून मुक्त करण्यासाठी मदत करते. जिऱ्यामध्ये नैसर्गिक तेल असते, ज्यामुळे पचन सुधारते. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा जिरे घालून उकळवण्यासाठी ठेवा. नंतर हे पाणी गाळून जेवणानंतर प्या. यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होईल.

ना व्यायाम-ना डाएट, फक्त उकळत्या पाण्यात ४ पैकी १ मसाला घालून प्या, काही दिवसात दिसेल फरक

ओव्याचे पाणी

ज्यांना अॅसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी ओवा जरूर खावा. ओव्यातील गुणधर्मामुळे पचनशक्ती सुधारते, शिवाय रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. यासाठी उकळत्या पाण्यात चमचाभर ओवा घालून चहा तयार करा, व ओव्याचा हा तयार चहा दररोज सकाळी प्या. 

Web Title: Acidity Problems? 4 Home Remedies That Can Help you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.