Join us   

कोणती डाळ खाल्ल्याने गॅसेसचा त्रास होतो? अपचन-करपट ढेकर येतात? ५ डाळी करा बाद कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 1:27 PM

Acidity Too Much? Stop Consuming These 5 Dals रात्री आपण डाळी खातो, पण पचनशक्ती कमी असेल तर पोटात गुडगुड होणारच..

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे पोटात होणाऱ्या गॅसेसची समस्या सामान्य झाली आहे. प्रत्येकाने कधी ना कधी पोट फुग्ण्याच्या त्रासाला तोंड दिलंच असेल. गॅसेसमुळे पोट तर फुगतेच, यासह अपचन, ब्लोटींग, अस्वस्थ वाटणे, हे त्रास देखील छळतात. पोट फुग्ण्याचा त्रास काही विशेष पदार्थांमुळे होतो.

काही वेळेला डाळीमुळे देखील गॅसेसचा त्रास होतो. आपल्या भारतात डाळ आणि भात हा एक कॉमन पदार्थ आहे. जो प्रत्येक घरात तयार होतो. भाताशिवाय डाळ आणि डाळीशिवाय भात अपूर्ण आहे. परंतु, आहारात डाळीचे प्रमाण जास्त असेल तर, पोटात गॅस नक्कीच तयार होणार(Acidity Too Much? Stop Consuming These 5 Dals).

डाळी आहारात असणं का गरजेचं?

'द हेल्थ साईट' या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, डाळी खाल्ल्याने शरीराला प्रोटीन आणि फायबर मिळते. तसेच आयर्न, झिंक, फॉलेट आणि मॅग्नेशियम यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. परंतु, डाळ खाण्याची देखील एक विशिष्ट वेळ आहे. डाळ कधी खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो? डाळ कोणती खावी? कोणत्या डाळीमुळे पोटात गॅस तयार होतो? हे पाहूयात.

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण..

मसूर डाळ

जर आपल्याला पोट फुग्ण्याचा त्रास होत असेल तर, मसूर डाळीचे सेवन करु नका. मसूर डाळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅसेस, अपचन, पोटदुखी, आंबट ढेकर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यासह युरिक अॅसिडची पातळीही वाढते. त्यामुळे मसूर डाळ रात्रीच्या वेळी खाणं टाळा, किंवा कमी खा.

तूर डाळ

वरण किंवा भाजी करण्यासाठी आपण तूर डाळीचा वापर करतो. तूर डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. तूर डाळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात गॅसेसची समस्या निर्माण होते. त्यामुळे तूर डाळ कमी प्रमाणात खावी व दिवसातच खावी.

३ महिने रोज ३ ग्रॅम जिरे खाण्याचे ५ भन्नाट फायदे, वजनही घटेल-पोटाचे आजार असतील तर करा हा उपाय

उडीद डाळ

उडदाच्या डाळीमुळे पोटात गॅस तयार होऊ शकते. ज्यामुळे पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात. उडीद डाळीमध्ये फायबर आणि प्रथिने जास्त प्रमाणात आढळते. ज्यामुळे पोटात गॅस तयार होते.

राजमा

ज्यांना पचनाच्या निगडीत त्रास आहे, त्यांनी कमी प्रमाणात राजमा खावा. राजमामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटात गॅस तयार होऊ शकते. ब्लोटिंग सारख्या समस्या वारंवार होत असतील तर, अशा परिस्थितीत राजमाचे सेवन करू नका. यामुळे पोटाच्या निगडीत समस्या वाढू शकतात.

आहारात रव्याचे पदार्थ नियमित खाण्याचे ४ फायदे- वजन कमी होते-ब्लडप्रेशरही राहते नियंत्रणात

चणा डाळ

चणा डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. परंतु, ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, त्यांनी चणा डाळ खाणं टाळावे. चणा डाळीत भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. यासह दिवसभर अस्वस्थता निर्माण होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य