Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ‘नायरा’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इन्फेक्शनचा त्रास, ऐन तारुण्यात हा आजार होण्याचं कारण..

‘नायरा’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इन्फेक्शनचा त्रास, ऐन तारुण्यात हा आजार होण्याचं कारण..

Actor Shivangi Joshi hospitalised due to kidney infection; urges all to stay hydrated अनेक तरुणींना ऐन तारुण्यात युरिन इन्फेक्शनसह किडनीचे आजार छळतात, त्यावर उपाय वेळीच करायला हवेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 01:53 PM2023-03-18T13:53:48+5:302023-03-18T13:55:46+5:30

Actor Shivangi Joshi hospitalised due to kidney infection; urges all to stay hydrated अनेक तरुणींना ऐन तारुण्यात युरिन इन्फेक्शनसह किडनीचे आजार छळतात, त्यावर उपाय वेळीच करायला हवेत..

Actor Shivangi Joshi hospitalised due to kidney infection; urges all to stay hydrated | ‘नायरा’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इन्फेक्शनचा त्रास, ऐन तारुण्यात हा आजार होण्याचं कारण..

‘नायरा’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला किडनी इन्फेक्शनचा त्रास, ऐन तारुण्यात हा आजार होण्याचं कारण..

उन्हाळ्यात शरीर लवकर डीहायड्रेट होते. शरीराला पुरेसं पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत आरोग्याच्या निगडीत अनेक समस्या उद्भवतात. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे किडनी इन्फेक्शन, किडनी स्टोन, किडनीच्या निगडीत समस्या निर्माण होतात. याच समस्येशी दोन हात शिवांगी जोशी ही टीव्ही अभिनेत्री करीत आहे. ती सध्या किडनीच्या आजारावर उपचार घेत असून, तिने तब्येत बरी झाल्यानंतर फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे.

तिने यामध्ये आजारपणाबद्दल सांगितले आहे. व हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, किडनी इन्फेक्शन म्हणजे काय? किडनीचा आणि हायड्रेट राहण्याचा संबंध आहे का? याबाबतीत जाणून घेऊया(Actor Shivangi Joshi hospitalised due to kidney infection; urges all to stay hydrated).

रबडी-जिलेबी खाल्ल्याने खरंच मायग्रेनचा त्रास कमी होतो? खरं-खोटं नक्की काय?

हायड्रेट राहणे आणि किडनी इन्फेक्शन

संपूर्ण भारतात उष्णताच्या झळा बसत आहे. या काळात हायड्रेटेड न राहण्याचा मोठा फटका किडनीला होत आहे. अनेकदा उन्हाळ्यात किडनीच्या संसर्गाची प्रकरणेही वाढली आहे. उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे लोकांना किडनीच्या संबंधित आजाराला सामोरे जावे लागत आहे.

तुम्ही उभं राहून पाणी पिता? उभं राहून पाणी पिणे योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात..

किडनी संसर्ग म्हणजे काय? ते का होते?

मूत्रमार्गात ई कोलाईमुळे बॅक्टेरियल इनफेक्शन झाल्यास किडनी इन्फेक्शन होते. जेव्हा मूत्रमार्गातील जीवाणू मूत्रमार्गात जातात, एक किंवा दोन्ही मूत्रपिंडांना संक्रमित करतात, तेव्हा किडनी संसर्ग होतो. महिलांमध्ये ही समस्या अधिक निदर्शनास येते.

किडनी संसर्गाची लक्षणे काय आहेत?

किडनीला संसर्ग झाल्यास पाठीच्या खालच्या भागात व ओटीपोटात प्रचंड वेदना होतात. यासह जननेंद्रियांभोवती वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागते.

शरीर अस्वस्थ होते, व ताप येतो. तापासोबत अंग थरथरते आणि थंडी वाजू लागते. ज्यामुळे शरीरात अशक्तपणा जाणवतो.

जेवणाची इच्छा मरते. भूक लागत नाही. प्रचंड आळस येतो.

उन्हाळयात रोज लिंबू पाणी प्यावे का? कुणी आणि कधी - किती प्यावे?

काही प्रकरणांमध्ये, लघवी करताना जळजळने, यासह पिडीत व्यक्तीला जुलाब देखील होऊ शकते.

हायड्रेटेड राहणे गरजेचे का आहे?

किडनीच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना अनेकदा पाणी पिण्याचा सल्ला मिळतो. यामुळे किडनीतून बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत होते. गडद रंगाची लघवी आणि दुर्गंधीयुक्त लघवी थांबत नाही तोपर्यंत पाणी पीत राहावे, असा सल्ला डॉक्टर देतात.

शुगर असणाऱ्या व्यक्तींनी रोज किती पाणी प्यायला हवे? कमी पाणी पिण्याचा शुगरचा त्रास वाढण्याशी असतो संबंध?

डिहायड्रेशनचा धोका

एनसीबीच्या रिपोर्टनुसार, डिहायड्रेशन म्हणजेच कमी पाणी पिणे, यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) होण्याची शक्यता निर्माण होते. ज्यामुळे किडनीचे आजार, किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. लघवी करताना दुखणे, जळजळ होणे, वारंवार लघवी होणे, लघवीतून रक्त येणे, लघवीला दुर्गंधी येणे आणि पोटाच्या खालच्या भागात सतत दुखणे हे डिहायड्रेशनमुळे होणारे त्रास आहेत.

Web Title: Actor Shivangi Joshi hospitalised due to kidney infection; urges all to stay hydrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.