Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चष्मा नकोसा वाटतो, नजर तेज ठेवण्यासाठी रोज ५ पदार्थ खा; डोळ्यांच्या तक्रारी राहतील दूर

चष्मा नकोसा वाटतो, नजर तेज ठेवण्यासाठी रोज ५ पदार्थ खा; डोळ्यांच्या तक्रारी राहतील दूर

5 Foods To improve Eye sights (Chshma Ghalvnyache Upay sanga) : पोषक तत्वांनी परिपूर्ण पदार्थांचा आहारात समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 04:04 PM2024-03-04T16:04:53+5:302024-03-04T16:41:35+5:30

5 Foods To improve Eye sights (Chshma Ghalvnyache Upay sanga) : पोषक तत्वांनी परिपूर्ण पदार्थांचा आहारात समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील.

Add 5 These Foods In Your Diet To improve Eye sights And Get Rid Of Eye Disease According to Research | चष्मा नकोसा वाटतो, नजर तेज ठेवण्यासाठी रोज ५ पदार्थ खा; डोळ्यांच्या तक्रारी राहतील दूर

चष्मा नकोसा वाटतो, नजर तेज ठेवण्यासाठी रोज ५ पदार्थ खा; डोळ्यांच्या तक्रारी राहतील दूर

जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांना  धुसर दिसत असेल किंवा खाज, जळजळ होणं अशा समस्या उद्भवत असतील किंवा डोळे थकल्यासारखे वाटत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुमचे डोळे कमकुवत होत आहेत.(Effective Foods To Get Rid Of Glasses Naturally) यापैकी कोणतीही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून त्वरीत आहारात बदल करून घ्यायला हवा. (How to Remove Spectacles Permanently)

असा कोणताही खास आहार नाही ज्यामुळे  दृष्टी सुधारेल. (Home Remedies To Get Rid Of Spectacles) पोषक तत्वांनी परिपूर्ण पदार्थांचा आहारात समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील. वाढत्या वयात  मॅक्युलर डिजनरेशन आणि मोतिबिंदू यांसारख्या समस्यांचा धोका उद्भवतो. (How To Remove Specs Permanently)

डोळ्यांच्या कमकुवतपणाची लक्षणं आणि कारणं (Symptoms Of Weak Eyes)

डोळ्यांच्या कमकुवतपणाची अनेक कारणं असू शकतात. ज्यात थकवा येणं, वय वाढणं, चुकीचं खाणंपिणं आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांचा समावेश आहे. धुसर दिसणं हे डोळ्यांच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. डोळ्यांची जळजळ होणं,  खाज येणं हे कमकुवतपणाचे लक्षण आहे.

ज्यामुळे डोळे लाल होतात आणि डोळ्यांमधून पाणी येऊ शकतं. थोड्या वेळाने डोळ्यांना थकवा येतो. डोकेदुखी डोळ्यांच्या कमकुवतपणाचे कारण ठरते खासकरून जेव्हा आपण कंम्प्यूटरचा वापर करतो तेव्हा हे जाणवते. 

इसेंशियल फॅटी एसिड्स

अमेरिकन ऑप्टोमॅट्रिक असोसियेशनच्या रिपोर्टनुसार ओमेगा-३ फॅटी एसिड्स डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुमच्या आहारात ओमेगा-३ फॅटी एसिड्सयुक्त पदार्थांचा समावेश असेल डोळे चांगले राहतात.  ओमेगा-३ फॅटी एसिड्से डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

हिरव्या भाज्या 

अनेक अभ्यासांमधून असं दिसून आले आहे की ल्युटीन आणि झेक्साथिनमुळे डोळ्यांच्या आजारांचा धोका टळतो.  हिरव्या भाज्या ल्युटीनचा उत्तम स्त्रोत आहे. ब्रोकोली, कॉर्न, पालक, मेथी,  शिमला मिरची या भाज्यांचा आहारात समावेश करायला हवा. 

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिळवे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

गाजर

गाजरात बीटा कॅरोटीन असते. ज्यामुळे शरीराला व्हिटामीन ए सुद्धा मिळते. व्हिटामीन ए च्या सेवनाने रात्रीच्यावेळेची डोळ्यांची पाहण्याची क्षमता सुधारते आणि बाहेरचा पोर्शन म्हणजेच कॉर्निया चांगला राहतो. 

तारूण्यातच हाडं खिळखिळी करते व्हिटामीन बी १२ ची कमी; ५ पदार्थ खा-मिळवा मजबूत हाडं, अमेरिकन डॉक्टरांचा सल्ला

ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुटसमध्ये जिंकचे प्रमाण जास्त असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असते. बदाम, अखरोड, आळशीच्या बीया व्हिटामीन  ई चा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. 

आंबट फळं

संत्री, द्राक्ष, लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. हे एक एंटी ऑक्सिडेंट आहे ज्यामुळे डोळ्यांचे नुकसान होत नाही.  तुम्ही फळांच्या ज्यूसचा आपल्या आहारात समावेश करू शकता. 

Web Title: Add 5 These Foods In Your Diet To improve Eye sights And Get Rid Of Eye Disease According to Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.