Join us   

दातांना आतून किड लागलीये-पिवळट दिसतात? ५ पदार्थ चावून खा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 12:36 PM

Foods Your Diet To Remove Tarter : पालक, केल यांसारख्या भाज्यांमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स आणि कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत.

दातांमधून दुर्गंध येणं ही एक कॉमन ओरल हेल्थची समस्या आहे.  (How to Take Care Of Teeth) यामुळे बरेच लोक  त्रस्त असतात. यामुळे तोंडातून दुर्गंध येते. ओरल हायजिनची योग्य काळजी न घेतल्यास दातांवर बराच खर्च करावा लागू शकतो. तेव्हा कुठे चांगले दात पुन्हा मिळतात. (Oral Health Tips) प्लाक किंवा टार्टरच्या रूपात हिरड्यांच्या मुळांमध्ये घाण साचले आणि दात आतून पोकळ होऊ लागतात.  ज्यामुळे दातांमध्ये पिवळेपणा येणं, तोंडातून दुर्गंध येणं, पायरिया,  दातदुखी अशा समस्या उद्भवतात. (Helpful Tips For Keeping Your Teeth White)

न्युट्रिशनिस्ट आणि डायटिशनय शिखा अग्रवाल यांच्यामते तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या टाळण्यासाठी तुम्हाला ओरल हायजिनकडे विशेष लक्ष द्यायला हवं.  (Foods Your Diet To Remove Tarter) खाण्यापिण्यात काही पदार्थांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे दात पांढरेशुभ्र आणि स्वच्छ राहतील. 

सफरचंद, गाजर इतर फळं

सफरचंद, गाजर यांसारखी क्रंची फळं किंवा भाज्या टुथब्रशप्रमाणे काम करतात.  यांच्या सेवनाने दातांवर जमा झालेला पिवळेपणा निघण्यास मदत होते आणि श्वासांचा दुर्गंधही येत नाही. 

डेअरी उत्पादनं

दूध, चीझ आणि दही यांसारखे डेअरी प्रोडक्ट कॅल्शियम, फॉस्फरेस यांसारखी पोषक तत्व असतात.  ज्यामुळे दात मजबूत राहतात. कॅल्शियम दातांचे इनॅमल स्ट्राँग बनवते आणि दातांना मेंटेन ठेवते. ज्यामुळे  दात निरोगी आणि चांगले राहण्यास मदत होते.  तोंडाचा दुर्गंधही येत नाही. 

पालेभाज्या

पालक, केल यांसारख्या भाज्यांमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स आणि कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत. याव्यतिरिक्त यात फॉलिक एसिडचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात

ग्रीन टी

ग्रीन टी चे अनेक फायदे आहे. यात पॉलिफेनॉल्स जास्त प्रमाणात असतात.  ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया आणि घाण कमी करण्यास मदत होते. रोज ग्रीन टी प्यायल्याने गम डिसिजेस कमी होतात.

स्ट्रोबेरी

स्ट्रॉबेरीत मॅलिक एसिड असते. जे एक नॅचरल टिथ व्हाईटनिंग एजंट आहे. एंटी ऑक्सिडेंट्सचाही चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे हिरड्यांची सूज कमी होते आणि तोंडातील घाण निघून जाण्यास मदत होते. 

ओटी पोट लटकतंय-चरबी कमी होईना? घरी ५ मिनिटांचा हा व्यायाम करा, महिन्याभरात स्लिम व्हाल

नट्स आणि  सिड्स

बदाम, पीनट आणि सिड्स यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते. याच्या सेवनाने शरीर निरोगी  राहते आणि तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य