Join us

घरात झुरळं-मुग्यांनी उच्छाद मांडलाय? लादी पुसताना पाण्यात १ पदार्थ मिसळा, उपद्रव होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 17:19 IST

Adding This Things In Mopping Water : व्हिनेगर आणि बेकींग सोड्याचे मिश्रण सर्व प्रकारच्या किटकांना दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

पावसाळ्याच्या दिवसांत घरात किडे, चिलटं, मुंग्या होण्याचा त्रास सर्वांच्याच घरी असतो.  या वातावरणात वेगवेगळे किडे, गांडूळ घरात फिरताना दिसतात.  (Cleaning Hacks & Tips)  तुम्हीसुद्धा घरात दिसणाऱ्या झुरळांना वैतागला असाल तर फरशी स्वच्छ करताना काही घरगुती उपाय करून तुम्ही फरशीवरचे किडे स्वच्छ करू शकता.  लादी पुसण्याच्या पाण्यात काही पदार्थ मिसळून लादी पुसल्याने फरशी स्वच्छ होईल आणि (Mopping water) किडे येणं बंद होईल. (Adding This Things In Mopping Water Will Prevent Ants Cockroaches And Other Insects)

घर पीडिया. कॉमच्या रिपोर्टनुसार घरात किटक येणं टाळण्यासाठी पाण्याची भांड उघड्यावर भरून ठेवणं टाळा. कारण पाण्यात डासांची पैदास होऊ शकते. तुळशीसारखे डासांना दूर ठेवणारे इन्डोअर प्लांट्स घरात ठेवा. बाथरूम दिवसातून एकदातरी स्वच्छ धुवा.

वॉकिंग की रनिंग-पोटाची चरबी घटवण्यासाठी काय करायचं? व्यायामासाठी योग्य वेळ कोणती, पाहा

टॉयलेट बाथरूमध्ये एक्सजॉस्ट फॅन असेल असे पाहा.  घरात ज्या ठिकाणी जास्त किटक येतात त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर घालून ठेवा. कपाटात किडे होऊ नयेत यासाठी घरात लवंग ठेवा.  उरलेले अन्नकण, खरकटं हे उघड्यावर नसेल याची काळजी घ्या.

पोट लटकतंय-दंड जाड दिसतात? डॉक्टर सांगतात ८०-१०-१० चा खास फॉम्यूला, झरझर घटेल चरबी

'या' पद्धतीने लादी पुसल्यास किडे येणार नाहीत

मीठ आणि लिंबाचे पाणी घालून फरशी साफ केल्यास किडे-दूर होतील.  यासाठी एका बादलीत पाणी घ्या. त्यात एक चमचा मीठ आणि लिंबाचा रस मिसळा. हे पाणी वापरून लादी पुसल्याने किडे फरशीवर दिसणार नाहीत. याव्यतिरिक्त एक कप पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्यात मीठ घाला  हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. फरशी पुसल्यानंतर भिंती आणि फरश्यांवर शिंपडा ज्यामुळे किडे दूर होतील. 

फरशीवर काळी मिरी घालून तुम्ही फरशी स्वच्छ करू शकता. एक बादली पाण्यात एक चमचा काळी मिरी किंवा काळी मिरीची पावडर घाला. हे पाणी व्यवस्थित हलवून फरशी पुसून घ्या. त्यानंतर फरशी स्वच्छ करा. काळी मिरीचा वास किड्यांना अजिबात आवडत नाही आणि किडे दूर पळू लागतात. 

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

व्हिनेगर आणि बेकींग सोड्याचे मिश्रण सर्व प्रकारच्या किटकांना दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. हे मिश्रण तयार करण्यासाठी एक चमचा व्हिनेगर घ्या त्यात बेकिंग सोडा घालून फरशीच्या पाण्यात घालून पुसून घ्या. या पाण्यात कापड बुडवून पिळून घ्या आणि फरशी स्वच्छ करा.  मुंग्या आणि झुरळांबरोबर अनेक किडे दूर राहतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल