उन्हाळ्यात आपण सरबतासाठी किंवा एखाद्या पदार्थाला चव येण्यासाठी आवर्जून लिंबाचा वापर करतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोजच्या आहारात आवर्जून लिंबाचा समावेश करायला हवा असं आपण कायम ऐकतो. मसाल्याच्या पदार्थांपैकी एक असणारे हे लिंबू आकाराने लहान असले तरी आरोग्याला त्याचे भरपूर फायदे असतात. त्याचप्रमाणे लिंबू जास्त प्रमाणात खाण्याचे तोटेही असतात. तसेच लिंबाचा वापर करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात, त्या कोणत्या पाहूया (Advantages and Disadvantages of Lemon)...
लिंबाचे फायदे
१. लिंबू कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स जमा होण्यास प्रतिबंध करत असल्याने लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होण्यास मदत होते.
२. लिंबामध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे मूत्रपिंडाच्या पेशींचे नुकसान होण्यास प्रतिबंध होतो.
३. खोकला आणि सर्दीमध्ये लिंबू फायदेशीर असते कारण लिंबू रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ज्यामुळे विविध संक्रमणांशी लढण्यास मदत होते.
४. कोमट पाण्यात मधासोबत नियमितपणे लिंबू घेतल्यास वजन कमी होते.
५. आयुर्वेदानुसार, मिठासह लिंबू घेणे हा मळमळ कमी करण्यासाठी एक सामान्य उपाय आहे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
लिंबू कोणी वापरु नये?
कच्चे लिंबू चवीला आंबट असते ते वात आणि कफ कमी करते परंतु पित्त वाढवते. आयुर्वेदानुसार खालील लक्षणे किंवा आरोग्याच्या समस्या असल्यास आहारात लिंबू टाळायला हवे. खालील तक्रारी असतील तर आहारात लिंबाचा समावेश टाळायला हवा. अन्यथा या तक्रारी वाढण्याची शक्यता असते.
१. पित्ताचा असमतोल
२. अन्ननलिकेमध्ये जळजळ होणे
३. अतिआम्लता
४. घशातील समस्या
५. सोरायसिस
६. एक्झिमा
७. अर्टिकारिया
८. रोसेसिया
९. तीव्र शरीर वेदना
१०. फायब्रोमायल्जिया
लिंबू वापरताना घ्यायची खबरदारी
१. सेवन करण्यासाठी नेहमी ताजे लिंबू वापरा आणि वापरण्यापूर्वी ते कापून घ्या.
२. हिवाळ्यात लिंबू फळाचा दररोज सेवन टाळा कारण त्याची आवळा (आंबट) चव जास्त असल्याने घशात हलकीशी जळजळ होऊ शकते.
३. जर तुम्हाला जास्त ऍसिडिटी आणि पित्ताशी संबंधित समस्या असतील तर लिंबू थोड्या प्रमाणात किंवा त्याचा रस पाण्यात मिसळून वापरा.