Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवण झाल्यावर रोज एक काम आवर्जून करा, ४ फायदे, तब्येत ठणठणीत....

जेवण झाल्यावर रोज एक काम आवर्जून करा, ४ फायदे, तब्येत ठणठणीत....

तब्येत चांगली राहण्यासाठी खाल्ल्यानंतर आपण आवर्जून चालायला हवे. आता खाल्ल्यानतंर चालल्याने शरीराला कोणते फायदे होतात, पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 01:44 PM2022-02-25T13:44:55+5:302022-02-25T14:31:37+5:30

तब्येत चांगली राहण्यासाठी खाल्ल्यानंतर आपण आवर्जून चालायला हवे. आता खाल्ल्यानतंर चालल्याने शरीराला कोणते फायदे होतात, पाहूया...

After the meal, do one thing every day, 4 benefits, for good health .... | जेवण झाल्यावर रोज एक काम आवर्जून करा, ४ फायदे, तब्येत ठणठणीत....

जेवण झाल्यावर रोज एक काम आवर्जून करा, ४ फायदे, तब्येत ठणठणीत....

Highlightsचालल्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. चालल्यामुळे शांत आणि गाढ झोप लागण्यासही मदत होते. 

जेवण झाले की आपल्याला काहीशी सुस्ती येते. अनेकदा दुपारचे जेवण झाले की आपल्याला ऑफीसचे काम असते. त्यामुळे आपण जेवलो की घाईघाईने पुन्हा कामाला बसतो. इतकेच नाही तर रात्रीचे जेवण झाल्यावरही दिवसभराच्या कामाचा थकवा आलेला असल्याने आपण बसून राहतो. पण अशाप्रकारे पोटात अन्न गेल्यावर बसून राहणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे ब्रेकफास्ट, लंच, डिनर अशा प्रत्येक खाण्यानंतर एक काम आपण आवर्जून करायला हवे. आता खाल्ल्यानंतर कोणते काम करायचे असे तुम्हाला वाटत असेल तर हे कोणते काम नसून आपली तब्येत चांगली राहण्यासाठी खाल्ल्यानंतर आपण आवर्जून चालायला हवे. आता खाल्ल्यानतंर चालल्याने शरीराला कोणते फायदे होतात, पाहूया...

१.  प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त 

जेवल्यानंतर शरीर अन्नावर प्रक्रिया करण्यास सुरुवात करते. आपण शरीराची थोडी हालचाल केल्यास अन्नाचे चांगल्यारितीने पचन होते. अन्नाचे योग्य पद्धतीने पचन झाले की शरीराच्या सर्व भागात त्याचे पोषक घटक पोचतात आणि प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. 

२. जेवणानंतर काही खाण्याची इच्छा होत नाही

आपल्याला अनेकदा पोटभर जेवलो तरी काहीतरी खाण्याची इच्छा होते. याचे कारण म्हणजे आपण खाल्लेले अन्न य़ोग्य पद्धतीने पचलेले नसते. पण जेवण झाल्यावर थोडे चाललो तर खाल्लेले अन्न पचते आणि अशाप्रकारे पुन्हा काहीही खाण्याची इच्छा होत नाही. काण असे सतत खाल्ल्याने वजन वाढण्याची, रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवणानंतर किमान १५ ते २० मिनीटे आवर्जून चालायला हवे. 

३. तणाव कमी होण्यास मदत

अनेकदा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ताणात असतो. हा ताण आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करत असतो. पण चालल्याने हा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. चालल्यामुळे शरीरात एंडोर्फिनची निर्मिती होते आणि आपल्याला नकळत फ्रेश वाटते.

(Image : Google)
(Image : Google)

४. पचनाच्या तक्रारी दूर होतात

चालणे हा एकप्रकारचा व्यायाम आहे. मात्र जेवणानंतर आपल्याला ठराविक प्रमाणातच चालायचे असते. चालल्यामुळे खाल्लेल्य़ा अन्नाचे चांगले पचन झाल्यास शरीरातील गॅसेस ढेकरच्या माध्यमातून बाहेर पडतात. तसेच जेवल्या जेवल्या झोपल्यास आपल्याला अॅसि़डीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी त्रास देऊ शकतात. चालल्यामुळे शांत आणि गाढ झोप लागण्यासही मदत होते. 

Web Title: After the meal, do one thing every day, 4 benefits, for good health ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.