शरीरात युरिक एसिड क्रिस्टल तयार झाल्यास किडनी स्टोन, गाऊट यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. वैद्यकिय क्षेत्रात युरिक एसिडचे बरेच उपाय सांगण्यात आले आहेत. युरिक एसिड काही घरगुती उपायांच्या मदतीनं तुम्ही कमी करू शकता. घरच्या घरी युरीक एसिड कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी फायदेशीर ठरतं. युरिक एसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी ओव्याचं पाणी कसं तयार करायंच समजून घेऊ. (Ajwain Is Very Beneficial in Controlling Increased Uric Acid)
ओव्यात कार्बोहायड्रेट, फायबर्स, प्रोटीन्स आणि खनिज पदार्थ यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. याव्यतिरिक्त ओव्यात फॉस्फरस, आयर्न, कॅल्शियम, थायमिन, रायबोफ्लेविन आणि नियासिन असते. जे तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. ओव्यातील ओमेगा ३ फॅटी एसिड्स वाढलेलं युरिक एसिड कमी करते. ओव्याच्या बियांमध्ये असे काही गुण असतात जे गाऊट उपचारांसाठी फायदेशीर ठरतात. ल्युटियोलिन युरिक एसिडचा स्तर कमी करण्यास मदत करते. सूज निर्माण करणारे नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादनही कमी होते.
ओव्याचे सेवन कसे करावे?
युरिक एसिड कंट्रोल करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायला हवं. रात्री १ ग्लास पाण्यात १ चमचा ओवा भिजवा नंतर सकाळी याचे सेवन करा. हे पाणी तुम्ही उकळूनही पिऊ शकता. ओव्याचं पाणी प्यायल्यानं पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात.
जसं की गॅस, ब्लोटींग यांसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी रोज ओव्याचं पाणी प्यायला हवं. यातील पोषक तत्व हृदयासंबंधित आजारांपासून बचाव करतात. ओव्याचं पाणी प्यायल्यानं वजन कमी करण्यास मदत होते. डायबिटीसच्या रुग्णांसाठीही ओव्याचे सेवन फायदेशीर ठरते.