Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आलिया भटला छळणारा ‘हा’ त्रास तुम्हालाही जाणवतो का? पाहा लक्षणं- ‘असं’ होत असेल तर..

आलिया भटला छळणारा ‘हा’ त्रास तुम्हालाही जाणवतो का? पाहा लक्षणं- ‘असं’ होत असेल तर..

Alia Bhatt opens up about her ADHD diagnosis: What is it? 6 symptoms of the common neurodevelopmental disorder : एडीएचडी नावाचा त्रास नेमका असतो काय? उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 05:25 PM2024-10-15T17:25:35+5:302024-10-15T18:30:39+5:30

Alia Bhatt opens up about her ADHD diagnosis: What is it? 6 symptoms of the common neurodevelopmental disorder : एडीएचडी नावाचा त्रास नेमका असतो काय? उपाय काय?

Alia Bhatt opens up about her ADHD diagnosis: What is it? 6 symptoms of the common neurodevelopmental disorder | आलिया भटला छळणारा ‘हा’ त्रास तुम्हालाही जाणवतो का? पाहा लक्षणं- ‘असं’ होत असेल तर..

आलिया भटला छळणारा ‘हा’ त्रास तुम्हालाही जाणवतो का? पाहा लक्षणं- ‘असं’ होत असेल तर..

शारीरिकपेक्षा मानसिक आजारही तितकाच घातक असतो (Mental Health Matters). मानसिक आजार चारचौघात दिसून येत नाही. बऱ्याचदा तो आपल्यालाही कळून येत नाही (Mental Health). पण बदलेला स्वभाव, संताप, तणाव यासह इतर गोष्टी जर वारंवार घडत असतील तर, वेळीच आपल्याला कोणता मानसिक आजार तर नसेल ना? याची तपासणी करणं गरजेचं आहे.

अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) नुकतंच (ADHD) अर्थात अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर असल्याचं समोर आलं. तिने या संदर्भातली माहिती एका मुलाखतीत दिली होती. तिला लहानपणापासून हा आजार असल्याचं निष्पन्न झालं. तिने यावर उपचार घ्यायलाही सुरुवात केली आहे(Alia Bhatt opens up about her ADHD diagnosis: What is it? 6 symptoms of the common neurodevelopmental disorder).

आलिया म्हणते, 'लहानपणी जेव्हा माझे सर्व मित्र एकत्र बोलत असत, तेव्हा ते मला तुझे लक्ष कुठे आहे असे विचारायचे. बऱ्याचदा मी माझ्याच विश्वात असायची. एकाग्र होतानाही अडचण निर्माण होत असे.' एकंदरीत या डिसऑर्डरमुळे नैराश्य, आत्मविश्वासाची कमतरता आणि एकाग्रतेच्या कमतरतेमुळे आपला स्वतःवर ताबा नसतो. पण एडीएचडी हा आजार नेमका काय? हा आजार ओळखायचा कसा? 

एडीएचडी म्हणजे काय?


एडीएचडी हा आजार नसून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. सामान्यतः हे मुलांमध्ये आढळते. परंतु, हा आजार मोठ्यांनाही होऊ शकतो. लहानपणी मेंदूला इजा झाली तरी हा आजार होण्याची शक्यता असते. या समस्येमुळे बऱ्याच जणांना उदासिनता, नैराश्य, जेवण आणि झोपेची समस्या, आत्मविश्वासाची कमतरता अशा समस्या उद्भवू शकतात. आलिया भटही अशाच परिस्थितीशी झुंजत आहे.

एडीएचडीची काही लक्षणं-

- मेयो क्लिनिकच्या मते, इंपल्सिव नेचर हे या रोगाचे पहिले लक्षण आहे. या स्थितीत कोणत्याही मुद्द्यावर विनाकारण राग येतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवर अतिउत्साहीपणा किंवा अतिउत्साह दिसून येतो.

- एडीएचडी असेलला व्यक्ती वेळेचे योग्य व्यवस्थापन करू शकत नाही. कधी तो वेळेच्या आधी काहीतरी करतो, किंवा वेळेनंतर नियोजित काम पूर्ण करतो. कोणत्याही गोष्टीवर एकाग्र करण्यात खूप त्रास होतो.

जेवणानंतर 'ही' चूक केली तर पश्चाताप अटळ, वजन वाढते झरझर! ५ मिनिटं ‘एवढं’ करा..

-  अनेक प्रकारची कामं दिल्यास, एका कामावर फोकस करण्यात त्रास होऊ शकतो. उदारणार्थ, जर आपण एडीएचडीग्रस्ताला एकाचवेळी किराणा, लॉन्ड्रीतून कपडे आणणे, किंवा एखाद्या व्यक्तीला भेटण्यास सांगितले तर, कदाचित ती व्यक्ती हे तिन्ही कामं करताना गोंधळू शकते.

- त्यांचं दिनचर्य पूर्ण करण्यास त्यांना अडचण येते. ज्यामुळे ती व्यक्ती नेहमी अस्वस्थ असते. ते एका जागी काही वेळ बसू शकत नाही किंवा कुठेही एका जागी उभे राहू शकत नाही. ती व्यक्ती खूप हायपरॅक्टिव्ह असते.

- अशा लोकांचा मूड क्षणोक्षणी बदलत राहतो. त्यांचा मूड कधी बदलेल हे त्यांना स्वतःलाही कळून येत नाही.

- आजूबाजूला काय चालले आहे याचे भान नसणे. बऱ्याचदा संभाषण चालू असताना, मध्येच लक्ष विचलित होते.

- अशी व्यक्ती लवकर थकते. ते विचार न करता निर्णय घेतात आणि अनेकदा त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. काहीही विचार न करता बोलणे किंवा विचार न करता काहीही करणे ही त्यांची सवय आहे.


- अशा व्यक्तींना प्रत्येक गोष्टीचा राग येतो. ते आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. शिवाय तणावाखालीही असतात.

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

उपाय काय?

भारतात बहुतांश जणांना ही समस्या आहे. मात्र, आपल्या मुलांमध्ये ही लक्षणं दिसून येत असतील तर, दुर्लक्ष करू नका. मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपाययोजना करायला हव्यात. योग्य वेळीस उपचार घेतल्यास भविष्यात होणारा त्रास नियंत्रणात येऊ शकतो. परंतु या समस्येचा स्वीकार ही महत्त्वाची गोष्ट आहे.   

Web Title: Alia Bhatt opens up about her ADHD diagnosis: What is it? 6 symptoms of the common neurodevelopmental disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.