Join us   

Alkaline water : विराट कोहोली खरंच महागडं अल्कलाईन वॉटर पितो ? त्यानं स्वत: खुलासा करत दिलं उत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:05 PM

Alkaline water : केवळ विराटच नाही तर अभिनेत्री अनुष्का शर्मा, मलायका अरोरा आणि श्रुती हसन आणि अगदी चित्रपट निर्माते करण जोहर सुद्धा चांगल्या आरोग्यासाठी अल्कलाईन वॉटर घेतात.

सेलिब्रिटी रोजच्या जगण्यात ब्लॅक वॉटर म्हणजेच अल्कलाईन वॉटरचा आपल्या आहारात समावेश करतात. असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अभिनेत्री मलायका अरोरा आणि क्रिकेटपटू विराट कोहोली अल्कलाईन वॉटर पीत असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं आणि सोशल मीडियावर चर्चांना सुरूवात झाली. ट्विटरवर एका मजेशीर प्रश्नोतरांच्या सत्रात कोहोलीनं तो अल्कलाईन वॉटर पीत असल्याचं सांगितलं आहे.  “मी काही वेळा ब्लॅक वॉटर  पिण्याचा प्रयत्न केला आहे पण मी ते नियमितपणे पीत नाही. कधीतरी आम्ही घरी अल्कलाईन वॉटर पितो” असं तो व्हिडिओमध्ये म्हणतो.

केवळ विराटच नाही तर अभिनेत्री अनुष्का शर्मा, मलायका अरोरा आणि श्रुती हसन आणि अगदी चित्रपट निर्माते करण जोहर सुद्धा चांगल्या आरोग्यासाठी अल्कलाईन वॉटर घेतात. ब्लॅक वॉटर  फ्री रॅडीकल्सशी लढण्यास मदत करते असं म्हटलं जातं. यात एंटीऑक्सिडंट्स असतात. . 8-10 च्या pH मूल्य असते याऊलट सामान्य पाण्याचे pH 6.5 ते 7.5 आहे.

अल्कलाईन वॉटरच्या सेवनाचे फायदे

अल्कलाईन वॉटर नियमितपणे प्यायल्याने तुमच्या रक्ताभिसरण प्रणालीची कार्यक्षमता सुधारू शकते, असे हॅवेल्स इंडिया लिमिटेडचे ​​वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. सुरेश सिसोदिया यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितले. डॉ  सिसोदिया  यांच्या म्हणण्यानुसार, हे पाणी रक्ताच्या गुणवत्तेत अशा प्रकारे बदल करते की अधिक ऑक्सिजन महत्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचतो. क्षारीय पाण्याचे सर्व गुण रोग, संक्रमणांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात.

अलिकडच्या वर्षांत, अल्कलाईन वॉटर पिण्याचे फायदे हायलाइट करणारे बरेच अभ्यास झाले आहेत. एव्हिडन्स-बेस्ड कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसासर अल्कलाईन वॉटर वृद्धत्वात घट होण्याच्या दृष्टीने उच्च दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी फायदेशीर ठरते.  असं म्हटलं जाते की अल्कलाईन वॉटर शरीरातील विषारीपणा काढून टाकते आणि शरीराद्वारे सहजपणे शोषले जाते.

त्याच्या मूळ स्वरूपामुळे, ब्लॅक वॉटर रक्तप्रवाहातील आम्लयुक्त सामग्री न्यूट्रिलाईज करते, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेंशियल (ORP) कमी करते. अल्कधर्मी पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत जसे की पचन सुरळीत ठेवणं,  हाडं मजबूत करणे, वजन कमी करणे, त्वचा आणि शरीरासाठी चांगल्या हायड्रेशन सोबतच वृद्धत्वविरोधी आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म इ.   

टॅग्स : विराट कोहलीहेल्थ टिप्सआरोग्य