Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ब्रेडबद्द्ल माहिती असायलाच हव्यात ४ गोष्टी; ब्राऊन, मल्टीग्रेन ब्रेड खरंच हेल्दी असतो?

ब्रेडबद्द्ल माहिती असायलाच हव्यात ४ गोष्टी; ब्राऊन, मल्टीग्रेन ब्रेड खरंच हेल्दी असतो?

All About Bread in India : पोळी किंवा भाकरीला पर्याय म्हणून आपण ब्रेडचे हेल्दी पर्याय घेतो, पण ते खरंच हेल्दी असतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2023 02:44 PM2023-07-30T14:44:39+5:302023-07-30T14:46:06+5:30

All About Bread in India : पोळी किंवा भाकरीला पर्याय म्हणून आपण ब्रेडचे हेल्दी पर्याय घेतो, पण ते खरंच हेल्दी असतात...

All About Bread in India : 4 Must Know Things About Bread; Is brown, multigrain bread really healthy? | ब्रेडबद्द्ल माहिती असायलाच हव्यात ४ गोष्टी; ब्राऊन, मल्टीग्रेन ब्रेड खरंच हेल्दी असतो?

ब्रेडबद्द्ल माहिती असायलाच हव्यात ४ गोष्टी; ब्राऊन, मल्टीग्रेन ब्रेड खरंच हेल्दी असतो?

ब्रेड हा पाश्चात्य देशांकडून आपल्याकडे आलेला पदार्थ. खाण्यापिण्याच्या पद्धतीत आपण त्यांचे अगदी डोळे झाकून अनुकरण करतो मात्र इतर बाबतीत तितके करत नाही. ब्रेड ही सहज उपलब्ध असणारी, स्वस्तात मिळणारी आणि पोटभरीची गोष्ट असल्याने आपल्याकडे मिसळसोबत किंवा अगदी वडा, सामोसा आणि पावभाजीच्या भाजीसोबत सर्रास खाल्ली जाणारी गोष्ट. पाव किंवा ब्रेड मैद्याचा असतो म्हणून तो योग्य त्या प्रमाणातच खायला हवा, शक्यतो भाजून खायला हवा असे बरेच नियम आपण ब्रेड खाण्याबाबत नेहमीच ऐकतो. नुसता ब्रेड नाही तर ब्रेड पिझ्झा, चिज चिली टोस्ट, ब्रेड सँडविच असेही ब्रेडचे बरेच प्रकार आपण या ना त्या निमित्ताने खात असतो. पण या ब्रेडचे नक्की किती आणि कोणते प्रकार बाजारात मिळतात. ते कोणत्या घटकांपासून तयार केलेले असतात, त्याने शरीराला नेमके काय मिळते अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहित असतातच असं नाही. आज आपण ब्रेडबाबतच्या अशाच काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करुयात (All About Bread in India)...

१. व्हाईट ब्रेड 

हा मैद्यापासून तयार केलेला असतो आणि यामध्ये फायबर फारच कमी प्रमाणात असते. रिफाईंड करताना यातील काही घटक काढले जातात त्यात यातील फायबर काढले जाते. त्यामुळे हा ब्रेड आरोग्याला फारसा चांगला नसतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. ब्राऊन ब्रेड 

ब्राऊन ब्रेड हा पूर्णपणे गव्हापासून तयार केलेला असतो असं आपल्याला वाटतं. मात्र त्यामध्ये गव्हाच्या पिठाचे प्रमाण खूपच कमी असते. यामध्ये कॅरेमल कलर घातल्याने तो ब्राऊन दिसतो. हा कॅरेमल कलर कोकाकोला आणि बोर्नविटामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगाच्या जवळपास जाणारा असतो.  

३. होलव्हीट ब्रेड

हाही पूर्णपणे होल व्हीटपासून तयार केला आहे असे आपल्याला वाटते. मात्र तसे नसून मैदा हाच यातील मुख्य घटक असतो, तसे याच्या पॅकींगवर अनेकदा लिहीलेलेही असते. तर यामध्ये अवघे २० टक्के होलव्हीट घातलेले असते. मात्र होलव्हीटचा वापर केलेला असल्याने या ब्रेडला होलव्हीट ब्रेड म्हटले जाते.

४. मल्टीग्रेन ब्रेड

मल्टीग्रेन म्हणजे हा ब्रेड हेल्दी असतो असे नाही तर यामध्ये एकापेक्षा जास्त धान्ये वापरलेली असतात इतकेच. भारतातील बहुतांश मल्टीग्रेन ब्रेड हे मैद्याचे बनवलेले असतात. या ब्रेडच्या पाकीटावरही सगळ्यात आधी मैदा लिहीलेले असेल तर त्यात मैद्याचे प्रमाण जास्त असते हे आपण ओळखायला हवे कारण कोणत्याही पदार्थावर घटकांची यादी लिहीताना जो घटक जास्त आहे तो सगळ्यात आधी लिहीला जातो. 

आता कोणताच ब्रेड चांगला नसेल तर काय करायचं?

१. घरच्या घरी ब्रेड तयार करायचा प्रयत्न करा, पण हे सगळ्यांनाच शक्य होईल असे नाही.

२. ब्रेडच्या ऐवजी पोळी खाणे हा सर्वात चांगला उपाय आहे. 

३. ब्रेड खरेदी करताना मैदा, पाम ऑईल आणि प्रिझर्व्हेटीव्हज नसलेला ब्रेड शक्यतो खरेदी करा. 
 

Web Title: All About Bread in India : 4 Must Know Things About Bread; Is brown, multigrain bread really healthy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.