Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुम्हाला माहितीच नसतील बदामांच्या सालांचे ४ उपाय, केस दाट-दातांचा पिवळेपणा गायब आणि..

तुम्हाला माहितीच नसतील बदामांच्या सालांचे ४ उपाय, केस दाट-दातांचा पिवळेपणा गायब आणि..

Almond peels: Health benefits and how to use them for skin and Teeth : बदामाची साल कचऱ्यात फेकून देण्यापूर्वी पाहा ४ उपयोग; मिळतील फायदेच - फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 04:00 PM2024-10-09T16:00:23+5:302024-10-09T16:07:04+5:30

Almond peels: Health benefits and how to use them for skin and Teeth : बदामाची साल कचऱ्यात फेकून देण्यापूर्वी पाहा ४ उपयोग; मिळतील फायदेच - फायदे

Almond peels: Health benefits and how to use them for skin and Teeth | तुम्हाला माहितीच नसतील बदामांच्या सालांचे ४ उपाय, केस दाट-दातांचा पिवळेपणा गायब आणि..

तुम्हाला माहितीच नसतील बदामांच्या सालांचे ४ उपाय, केस दाट-दातांचा पिवळेपणा गायब आणि..

बदाम (Almond) खाणं आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं (Almond peel). यामुळे त्वचा, केस, मेंदू आणि वेट लॉससाठीही मदत होते. बदमामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फॉस्फरस, प्रोटीन आणि इतर अनेक पोषक घटक असतात (Health Benefits). हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सुपरफूड मानले जाते. बदामातील पौष्टीक घटक शरीराला मिळावे, यासाठी भिजलेले बदाम खाण्याचा सल्ला मिळतो.

भिजलेले बदाम खाण्यापूर्वी आपण ४-५ तास भिजत घालतो. नंतर साल काढून खातो. सालीसकट बदाम खाणं बरेच जण खाणं टाळतात. बदामाच्या सालीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट असतात आणि या सालींचा वापर हेअर मास्क, फेस पॅक आणि स्वादिष्ट चटणी बनवण्यासाठी करता येतो. बदामाच्या सालींचा वापर नेमका कसा करता येईल? पाहूयात(Almond peels: Health benefits and how to use them for skin and Teeth).

बदामच्या सालींचा वापर

हेअर मास्क

बदाम केसांसाठीही फायदेशीर ठरते. बदामाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. अशा परिस्थितीत या सालींचा वापर करून आपण हेअर मास्क तयार करू शकता. यामुळे केसांची उत्तम वाढ होईल. यासाठी बदामाची सालीची पेस्ट तयार करा. नंतर त्यात मध, एलोवेरा जेल घालून मिक्स करा. तयार पेस्ट केसांना लावा. नंतर शाम्पूने केस धुवा. यामुळे केसांना नवी चमक येईल.

ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल

बदामच्या सालीची चटणी

पौष्टिक बदामाच्या सालीची चटणी फक्त चाविलाच नसून, आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. बदामाच्या सालीची चटणी करण्यासाठी, कढईत तूप घाला. नंतर त्यात बदामाची साल, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी उडीद डाळ घालून साहित्य भाजून घ्या. मिक्सरच्या भांड्यात साहित्य घाला. नंतर त्यात लसूण, हिरवी मिरची, आले, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सर फिरवून घ्या. आता कढईत चमचाभर तूप घाला. नंतर त्यात कढीपत्ता, मोहरी, लाल सुकी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून भाजून घ्या. त्यात पेस्ट घालून मिक्स करा. अशा प्रकारे बदामाची चटणी खाण्यासाठी रेडी.

फेस पॅक

बदामाच्या सालीचा वापर आपण फेस पॅक तयार करण्यासाठीही करू शकता. अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई समृद्ध हा फेसपॅक चेहऱ्यावर तेज आणण्याचं काम करतं. फेसपॅक तयार करण्यासाठी बदामाच्या सालीची पेस्ट तयार करा. त्यात मध घालून मिक्स करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

पिवळे दात होतील पांढरे

दात स्वच्छ करण्यासाठी आपण साधारण टूथपेस्टचा वापर करतो. जर याच्या वापरानेही दात स्वच्छ होत नसतील तर, बदामाच्या सालींचा वापर करून पाहा. यासाठी बदामाची सालं आधी वाळवून घ्या. नंतर भाजून त्याची पावडर तयार करा. दात घासताना आपण या पावडरचा वापर करू शकता.

Web Title: Almond peels: Health benefits and how to use them for skin and Teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.