७- ८ तासांची शांत झोप होऊनही अनेकांना सकाळी उठल्यानंतर कधीच फ्रेश जाग येत नाही. कसंबसं करत ते उठतात. उठताना पुन्हा डोक्यात हेच विचार असतात की पुन्हा झोपण्याची वेळ कधी होईल... बरं हे काही एक दिवसांचं नसतं. एखाद्या दिवशी झालं तर आलेला थकवा (tired) समजण्यासारखा असतो. पण असं जर रोज रोज होत असेल, तर ते काही चांगल्या आरोग्याचं लक्षण (health issue) नाही. महिलांना तर हा त्रास जरा जास्तच जाणवतो. पण सकाळच्या वेळी त्यांच्यामागे प्रचंड घाई असल्याने त्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. (Deficiency Of Vitamin B12)
असा त्रास मात्र मुळीच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. आता तुम्ही वेळ नाही किंवा चालायचंच.. असं सांगून त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर नक्कीच भविष्यात गंभीर आजार होण्याचे धोके बळावतात. शांत आणि पूर्ण झोप होऊनही रोज रोज असा थकवा जाणवत असेल तर व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता हे त्यामागचे एक मुख्य कारण असू शकते. या त्रासासोबतच खालील काही लक्षणं जाणवत असतील तर लवकरच व्हिटॅमिन बी १२ ची तपासणी करून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच, पण त्यासोबतच आहारात काही पदार्थ नियमित घेत चला. (Vitamin B12 rich food)
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास
- भूक लागत नाही.
- श्वासोच्छवास करताना आवाज येतो.
- केस खूप गळतात.
- सतत चिडचिड होते.
- त्वचेवर पांढरे, पिवळे किंवा गडद रंगाचे पॅचेस दिसू लागतात.
- वारंवार तोंड येते.
- बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दूर करणारे पदार्थ
१. दही
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दूर करण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात नियमितपणे दही खा. रात्रीच्या वेळी दही खाणे टाळा. कारण त्यामुळे सर्दीचा त्रास होऊ शकतो आणि रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने पचन व्यवस्थित होत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो.
२. केळी
पोटॅशियम, मॅग्नेशियम यासोबतच व्हिटॅमिन बी १२ केळीमध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दररोज १- २ केळी नियमितपणे खाल्ल्यास नक्कीच व्हिटॅमिन बी १२ ची पातळी वाढण्यास मदत होते. केळीसुद्धा सकाळचा नाश्ता किंवा मग दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांच्यामधला जो काळ असतो, तेव्हा खावी.
३. दुग्धजन्य पदार्थ
दूध, चीज, योगर्ट या दुग्धजन्य पदार्थांमधूनही योग्य प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ मिळते. त्याशिवाय या पदार्थांमध्ये प्रोटीन्स, खनिजेदेखील भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे थकवा घालविण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दूर करण्यासाठी योगर्ट खाणार असाल, तर ते प्लेन खा. फ्लेवर्ड योगर्ट खाणे टाळा.
४. पालक
पालक हे एक सूपरफूड मानले जाते कारण ते अनेक आजारांवर अतिशय गुणकारी ठरते. शाकाहारी लोकांसाठी पालक हा व्हिटॅमिन बी १२ चा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. शिवाय त्यातून भरपूर प्रमाणात लोह मिळत असल्याने थकवा घालविण्यासाठी पालक खाणे उपयुक्त ठरते.
५. बीट
बीटला व्हिटॅमिन बी १२ चे स्टोअर हाऊस मानले जाते. त्यामुळे दररोजच्या आहारात बीटच्या मध्यम आकाराच्या २ ते ३ फोडी जरूर खाव्या.