Join us   

कायम 'तरुण' दिसायचं आहे, 6 अँटी एजिंग नियम.. वाढत्या वयाच्या खुणा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 2:18 PM

वयाच्या तिशी पस्तीशीनंतर एजिंगची समस्या प्रत्यक्षात दिसायला लागते. एजिंग हा सुंदर दिसण्यातला मोठा अडथळा. हा अडथळा येऊ द्यायचा नसेल तर अभ्यास आणि संशोधनातून सिध्द झालेले ॲण्टि एजिंगचे रुल पाळायलाच हवेत. -

ठळक मुद्दे शारीरिक कष्टाची कामं, व्यायाम यामुळे वय वाढलं तरी एजिंगची समस्या त्वचा आणि फिटनेसबाबत दूर ठेवता येते.कमी झोपेचा परिणाम मानसिक आरोग्यावर, त्वचेवर होतो आणि एजिंगची समस्या दिसायला लागते.हेल्दी बीएमआयमुळे निरोगी आणि छान उत्साहवर्धक आयुष्य जगता येतं.

जसा वयाचा आकडा वाढतो तशी एजिंगची चिंता सतावायला लागते. वय कितीही असलं तरी त्वचा आणि फिगर वरुन वय दिसायला नको असं प्र्त्येकीलाच वाटतं. पण नुसतं वाटून काय उपयोग? त्यासाठी प्रयत्न करणंही गरजेचं आहे. प्रयत्न केले नाहीत तर वय कमी असूनही चेहर आणि शरीरावरुन एजिंग हे दिसणारच. अनेकदा काहींच्या बाबतीत मात्र उलटं होतं. वय जास्त असूनही त्यांच्या चेहऱ्यावरुन , फिगरवरुन वय दिसत नाही. आहे त्या वयापेक्षा कमी दिसणाऱ्या अशा महिलांचं मग अप्रूप वाटतं. हे त्यांच्याबाबतीत घडतं ते ॲण्टि एजिंग रुल्स पाळल्यामुळे . ही बाब आपल्याही बाबतीत घडावी असं वाटत असल्यास हे ॲण्टिएजिंग रुल महत्त्वाचेच.

Image: Google

वयाच्या तिशी पस्तीशीनंतर एजिंगची समस्या प्रत्यक्षात दिसायला लागते. एजिंग हा सुंदर दिसण्यातला मोठा अडथळा. हा अडथळा येऊ द्यायचा नसेल तर ॲण्टि एजिंगचे रुल पाळायलाच हवेत.  ॲण्टि एजिंग रुल हे काही कोण्या पुस्तकात लिहिलेले नाहीत. तर वेगवेगळ्या संस्था, विद्यापिठं, व्यक्ती यांनी केलेले प्रयोग आणि अभ्यास याद्वारे आलेल्या निष्कर्षातून हे नियम सिध्द झालेले आहेत. काय आहेत हे नियम?

ॲण्टि एजिंग रुल्स

Image: Google

1. शारीरिक कष्ट घ्या तरुण राहा! आपल्या शरीराला, शरीरातील प्रत्येक हाडाला, स्नायुंना, अवयवांना हालचाल लागते, क्रिया लागते. ती केली नाही तर तेथील पेशी काम करत नाही. नवीन पेशी निर्माण होत नाही. पेशींची उलाढाल जितकी जास्त तितके तारुण्य हा नियम आहे. हाच नियम एजिंगविरुध्द काम करतो. शरीरास कष्ट पडणारे कामं करावीत.  एका जागी बसून, न हलता डुलता शरीर सक्रीय राहात नाही. यासाठी घरातली कामं, बागकाम, जास्तीत जास्त चालणं, लिफ्टचा वापर टाळून चढ-उतार करणं यामुळे वय वाढत असलं तरी त्याचा परिणाम शारीरिक ऊर्जा, उत्साह यावर होत नाही असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंग, युएस डिपार्टमेण्ट ऑफ हेल्थ ॲण्ड ह्युमन सर्व्हिसेस  यांनी केलेला अभ्यास सांगतो की, शारीरिक कष्टाची कामं, व्यायाम यामुळे वय वाढलं तरी एजिंगची समस्या त्वचा आणि फिटनेसबाबत दूर ठेवता येते. 

Image: Google

2. योगचा सराव करा आनंदी राहा

व्यायाम करताना योग साधनेला विशेष महत्त्व दिलं तर एजिंग आपल्याला नक्कीच दूर लोटता येते असं 'मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा'चे तज्ज्ञ अभ्यासक डाॅ.ईश्वर बसवरेड्डी  सांगतात. समग्र निरोगी आरोग्याचा विचार करता योग सराव हवाच. योग साधनेमुळे शरीर आणि मनाचा व्यायाम होतो. शरीर आणि मनात सुसंवाद निर्माण होण्यासाठी, आपण आणि निसर्ग यांच्यातलं नातं घट्ट होण्यासाठी योग सरावाला महत्त्व आहे. योग सरावामुळे आपली वैयक्तिक पातळीवरची सजगता वाढते. स्वत:कडे लक्ष देण्याची जाण योगसाधनेमुळे निर्माण होते. त्याचा फायदा शरीर मन निरोगी आणि उत्साही राहातं. वय वाढलं तरी त्यासोबत येणारी एजिंगची समस्या योगसाधनेमुळे खूप दूर लोटली जाते. 

Image: Google

3. शांत झोपेचा उपाय

झोप ही जैविक घडाळ्यातील एक कृती असली तरी तिचा संबंध आरोग्याशी आहे. केवळ लहान मुलांच्या वाढीसाठी पुरेशी झोप हवी असं नाही तर जसं वय वाढतं तसा झोपेचा मुद्दा महत्त्वाचा होतो. 'सेंटर्स फाॅर डिसीज कन्ट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन ' यांनी केलेला अभ्यास सांगतो, की 7 तास शांत झोप ही निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. वाढत्या वयातील खूपसे आजार हे झोपेच्या चुकीच्या पध्दतीशी निगडित असतात. तुम्ही आदल्या रात्री किती शांत झोपता यावर दुसऱ्या दिवशीचं कामाचं स्वरुप अवलंबून असतं. कमी झोपेचा परिणाम मानसिक आरोग्यावर, त्वचेवर होतो आणि एजिंगची समस्या दिसायला लागते. एजिंग हे दूर लोटायचं असेल तर शांत पुरेशी झोप् आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

 

Image: Google 

4. पौष्टिक खा हेल्दी राहा

आरोग्य निरोगी असेल तर फिटनेस आणि सौंदर्य याला एजिंगची समस्या स्पर्श करत नाही. निरोगी आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा घटक आहे. 30 नंतर आहारात जास्तीत जास्त भाज्या, फायबर , खनिजं आणि जीवनसत्त्वांचा समावेश असलेला आहार आवश्यक असतो. वाढत्या वयात विविध आजारांचा धोका असतो, हा धोका टाळण्यासाठी ॲण्टिऑक्सिडण्टस महत्त्वाचे असतात. हे ॲण्टिऑक्सिडण्टस रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्वचेच्या सौंदर्यासाठी ॲण्टिऑक्सिडण्टस महत्त्वाचे असतात.   आहारात पाणी, द्रवपदार्थ हा घटकही महत्त्वाचा असतो.  दिवसभरात पुरेसे पाणी प्यायलं तर त्याचा परिणाम वजन नियंत्रित राहाण्यावर होतो. परेसे पाणी प्याल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, चयापचय क्रिया सुधारते. त्वचा निरोगी राहाण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे असं तज्ज्ञ  सांगतात. आपल्या संपूर्ण दिवसाच्या आहारात पुरेसं पाणी पिणं, द्रवपदार्थांचा समावेश केल्यास फिटनेस राखता येतो, सौंदर्य जपता येतं. 

Image: Google

5. वजनावर लक्ष द्या जागरुक राहा

एजिंगची समस्या दिसते कारण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून. वय वाढतं तसं कंटाळा, कामाचा ताण यामुळे खाण्यापिण्याकडे,  व्यायामाकडे दुर्लक्ष होतं. याचा थेट परिणाम वजनावर होतो. बारीक असणं म्हणजे  निरोगी असणं नव्हे. एजिंगवर आरोग्यदायी वजन परिणाम करतं. त्यासाठी बीएमआयकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं.  हेल्दी बीएमआयमुळे निरोगी  आणि छान उत्साहवर्धक आयुष्य जगता येतं. वजन वाढल्यास किंवा प्रमाणापेक्षा कमी झाल्यास बीएमआय हेल्दी राहात नाही. त्यामुळे वेळोवेळी आपल्या वजनाकडे लक्ष द्यावं असं तज्ज्ञ सांगातात. अकारण वाढणारं वजन, कमी होणारं वजन आपल्याला योग्य वेळी कळल्यास त्यावर तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास फायदेशीर ठरुन पुढच्या आरोग्यविषय समस्या आणि त्याचा एजिंगच्या समस्येवर होणारा परिणाम टळतो.

Image: Google

6. नियमित वैद्यकीय तपासण्या

निरोगी राहून एजिंग टाळण्याचा महत्त्वाचा उपाय म्हणजे तिशीनंतर वैद्यकीय तपासण्या नियमित करणं. याचा उपयोग आरोग्यविषयक धोके वेळीच समजून त्यावर वेळीच उपाय करणं शक्य होतात.  वर सांगितलेल्या गोष्टी कोणाला माहीत नसतील अस्ं नाही, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.असं होऊ नये म्हणून संशोधन आणि अभ्यासातून सिध्द झालेले ॲण्टि एजिंग रुल्स पाळणे महत्त्वाचे आहे.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सब्यूटी टिप्सफिटनेस टिप्स