Join us   

काजू-बदामापेक्षा जास्त प्रोटीन देतो हा पदार्थ; रोज खा-स्वस्तात मिळेल पोषण, कॅन्सरचा टळेल धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 3:59 PM

Amazing Health Benefits of Dry Fruits : हेजलनट्समध्ये पुरेपूर पोषण असते.  यात हेल्दी फॅट्, व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात.

चांगल्या आरोग्यासाठी लोक ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश कराता. काजू, बदाम, अक्रोड  सगळ्यात उत्तम पोषण मुल्य असलेले ड्रायफ्रुट्स मानले जातात कारण यात बरीच पोषक तत्व असतात. पण तुम्हाला माहीत आहे का  यापेक्षा जास्त कॅल्शियम जास्त देणारा पदार्थ म्हणजे हेजलनट यात अनेक पोषक तत्व असतात. (Hazelnuts Benefit Your Health) जे काजू बदामापेक्षाही जास्त प्रभावी ठरते. हेजलनट्समध्ये पुरेपूर पोषण असते.  यात हेल्दी फॅट्, व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार हेजलनट्स खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. याशिवाय वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरते. (Amazing Health benefits of Hazelnut for Cancer Weakness Bones and Brain)

हेजलनट्समध्ये काय असते?

१) हेजलनट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरेस असते. ज्यामुळे हाडं चांगली राहतात. हे मिनरल्स हाडांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.  यात व्हिटामीन सी सुद्धा असते. ज्यामुळे इम्यूनिटी चांगली राहण्यास मदत होते. हे व्हिटामीन शरीरातील संक्रमण आणि इतर रोगांचा बचाव करण्यास मदत करते. यात व्हिटामीन ई असते जे एक शक्तीशाली एंटीऑक्सिडेंट्स आहे. यामुळे कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखता येतो. 

२) हेजलनट्समध्ये मोनोअनसॅच्युरेडेट फॅट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. यामुळे खराब कोलेस्ट्रेरॉल बाहेर निघण्यास मदत होते. याशिवाय हृदयाच्या आजारांचाही धोका कमी होतो.

३) हेजलनट्समध्ये व्हिटामीन ई आणि व्हिटामीन्स बी असतात जे आरोग्यासाठी फार महत्वाचे ठरतात. व्हिटामीन ई त्वचेला मऊ-मुलायम बनवते आणि यामुळे त्वचा हायड्रेट राहते. व्हिटामीन ई आणि बी केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी, केसांना मऊ मुलायम बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. 

रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ घालून प्या; ४ इंच घटेल कंबर-झटपट सपाट होईल पोट

४) ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या आजकाल खूपच सामान्य झाली आहे. BP नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काही प्रमाणात बदल करायला हवेत. हेजलनट्सचे सेवन करून तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकता. यात फॅट्स कमी आणि फायबर्स  जास्त असतात. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. 

५) शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास हेजलनट्स फायदेशीर ठरतात. हेजलनट्समध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न, प्रोटीन्स आणि पोटॅशियम असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स