Join us   

कोण म्हणतं चहाने ॲसिडिटी होते? गुळाचा चहा पिण्याचे ५ फायदे; आजार दूर-वजनही वाढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 11:53 AM

Amazing Health Benefits of Jaggery Tea : या चहात आयर्न, फायबर्स,पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे इम्यूनिटी बुस्ट होऊन पचनक्रियाही चांगली राहते. 

सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा प्यावासा वाटतो. चहाशिवाय दिवस सुरूच होत नाही असे अनेकजण असतात. चहाला गोडवा येण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. पण हेल्दी शरीरासाठी तुम्ही चहात साखरेऐवजी गुळाचा समावेश करू शकता. कारण रिफाईन साखरेच्या तुलनेत गूळ अधिक फायदेशीर ठरतो.  साखर खाल्ल्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो. (Amazing health benefits of jaggery tea to boost immunity and reduce weight joint)

तुम्ही दुधाच्या चहात जर गूळ घातला तर हा एक हेल्दी ऑपश्न असू  शकतो.  तुम्ही चहा पावडर, लवंग, दालचिनी, तुळस, आलं, पाण्यात गूळ मिसळून चहा बनवू शकता.  या चहात आयर्न, फायबर्स,पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे इम्यूनिटी बुस्ट होऊन पचनक्रियाही चांगली राहते. 

रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते

वेलकर्व डॉट इनच्या रिपोर्टनुसार वातावरणात बदल झाल्यामुळे लोक आजारी पडतात. गुळाचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. यात तुम्ही गुळासह आलं घालू शकता. यात आयर्न, जिंक,सेलेनियम, मिनरल्स  असतात. ज्यामुळे शरीराला अधिकाधिक फायदे मिळतात.

पोटातील विषारी घटक बाहेर-शरीर होईल डिटॉक्स; रोज सकाळी 'हा' पदार्थ खा-फिट, निरोगी राहा

वजन कमी होण्यास मदत

जर तुमचं वजन वाढलं असेल तर तुम्ही गुळाच्या चहाचा  आहारात समावेश करू शकता. गुळात न्युटिएंट्स असतात. ज्यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत होते. याशिवाय चहा मेटाबॉलिझम बुस्ट करते. अतिरिक्त वजन कमी करण्यासही मदत होते. 

पचनक्रिया चांगली राहते

जर तुमची पचनक्रिया खराब असेल तर तुम्ही गुळाच्या चहाच्या आहारात समावेश करू शकता. चहा बाऊल मुव्हमेंट वाढवते. गुळाचा चहा प्यायल्याने गॅसेसचा त्रास कमी होतो.यामुळे बाऊल मुव्हमेंट चांगली राहते. गुळाचा चहा प्यायल्याने डायडजेस्टिव्ह इंजाईम्स एक्टिव्ह होतात. सर्दी खोकल्याच्या त्रासावरही आराम मिळतो.

रक्ताची कमरता दूर होते

शरीरात हिमोग्लोबिनची पातळी मेंटेन राहण्यासाठी आयर्न गरजेचे असते. गुळात मोठ्या प्रमाणात आयर्न असते. आयर्न लाल रक्त पेशीं तसंच फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते.  रोज  गुळाचा चहा प्यायल्याने आयर्नची  कमतरता दूर होण्यास मदत होते.

पोट, कंबरेच्या टायर्समुळे शरीर जाडजूड दिसतंय? घरी हे १ योगासनं करा-चरबी भराभर होईल कमी 

सांधेदुखीच्या वेदना कमी होतात

गुळाच्या चहात व्हिटामीन्स आणि इतर पोषक तत्व असतात. ज्यामुळे सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित समस्या टाळता येतात. गुळाच्या चहाच्या सेवनाने हाडांच्या इतर समस्या दूर होतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य