भारतातील सर्वच घरांमध्ये डाळींचे सेवन केले जाते. डाळी पौष्टीक तितक्याच पचायलाही हलक्या असतात. डाळीत प्रोटीन, फाबयर्स, व्हिटामीन्स मिनरल्स अशी अनेक पोषक तत्व असतात. (Health Tips) नियमित डाळींचे सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते याशिवाय शुगर कंट्रोल, वजन कमी करणं, कॅन्सरपासून बचाव होण्यासही मदत होते. डाळी सर्वांच्याच घरी बनतात. (Amazing Health Benefits Of Soaking Lentils)
न्युट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांनी डाळ शिजवण्याआधी भिजवण्याचा असरदार उपाय सांगितला आहे. ज्यामुळे संपूर्ण आरोग्याला फायदे मिळतात. डाळ भिजवून मग खायला हवी. ज्यातून शरीराला अधिक पोषक तत्व मिळतात आणि अधिक पौष्टीक बनते. डाळ भिजवून खाल्ल्याने शरीराला काय काय फायदे मिळतात ते समजून घेऊ. (Amazing Health Benefits Of Soaking Lentils Before Cooking According to Dietitian)
रिसर्सगेटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार डाळ भिजवल्यानं ऑलिगोसॅकराईड सारखी शुगर तोडण्यास मदत होते. ज्यामुळे पोट फुगणं आणि गॅस तयार होणं यांसारख्या समस्या टाळतात. ज्यामुळे डाळ पचवणं सोपं जातं यामुळे पचनाशीसंबंधित समस्याही उद्भवत नाही. (Ref) डाळ भिजवल्यानं लेक्टिन निष्क्रीय होण्यास मदत होते. लेक्टिन आतड्यात जळजळ निर्माण करू शकते. पोषक तत्वांच्या अवशोषणात बाथा येते. डाळ भिजवल्यानं लेक्टिनचे प्रमाण कमी करता येते. ज्यामुळे डाळ सहज पचते.
भिजवल्यानं डाळ मऊ पडते आणि लवकर शिजते. यामुळे फक्त वेळेची बचत होत नाही तर उर्जेचीसुद्धा बचत होते. ज्यामुळे स्वंयपाक करण्याची प्रक्रिया अधिक वेगानं होते. भिजवलेली डाळ लवकर शिजते. यादरम्यान डाळ शिजवायला जास्त पाणी लागत नाही. डाळीची चव वाढते आणि पदार्थ जास्त टेस्टी बनतो.
डाळ भिजवल्यानं त्यातील धूळ आणि घाण दूर होण्यास मदत होते. कारण डाळी पिकवताना बऱ्याच रसायनांचा वापर केला जातो. डाळ भिजवल्यानंतर लवकर शिजते. डाळ पाणी शोषून घेण्यास मदत करते ज्यामुळे जास्त मऊ आणि नरम होते. ज्यामुळे डाळीतलं पाणी शोषून घेतलं जातं.