हाडांच्या विकासासाठी प्रोटीन कॅल्शियमप्रमाणेच आयर्न आणि व्हिटामीन बी-१२ ( Vitamin B-12) सारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. ज्यामुळे रक्त वाहिन्या चांगल्या राहतात. याशिवाय शरीरात डिएनएसुद्धा तयार होते. व्हिटामीन बी-१२ एक प्रमुख बी-कॉम्पलेक्स आहे. (American Dr Mercola Told 5 High Vitamin B-12) हे व्हिटामीन शरीराच्या विकासासाठी आवश्यक असते. यामुळे रक्ताच्या पेशी चांगल्या रितीने कार्य करतात. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. नसा देखिल चांगल्या राहतात. (Top Foods For Vitamin B-12 For Muscles And Strong Bones)
शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. (Vegetarian Foods For Vitamin B-12) अमेरीकेतील प्रसिद्ध लेखक डॉ. जोसेफ मेरकोल यांनी व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी किती आवश्यक आहे आणि व्हिटामीन बी १२ च्या कमतरतेसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा याबाबत अधिक माहिती दिली आहे.
व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी काय खावे? (Foods For Vitamin B-12)
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार गव्हाची चपाती, दूध, केळी, स्ट्रॉबेरी, पालक, दही, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेचे मुख्य कारण आहे मेगालोब्लास्टिक एनिमिया. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे न्युरोलोजिकल समस्या उद्भवू शकतात.
ज्यामुळे स्मृती कमकुवत होणं, मेंदूचा विकास न होणं अशा समस्या उद्भवू शकतात. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता न्युरोपेथीचे कारण ठरते. ज्यामुळे हात, पायांमध्ये वेदना जाणवतात. मानसिक समस्याही उद्भवतात. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात जसं की डिप्रेशन, चिंता आणि ताण-तणाव.
दातांच्या मध्यभागी किड-वरून पिळवे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात
व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेची लक्षणं (Vitamin B-12 Deficiency Symptoms)
व्हिटामीन बी च्या कमतरतेमुळे डोकेदुखी, चक्कर येणं अशी लक्षणं दिसून येतात. पचनाच्यासंबंधित समस्या जसं की गॅस, अपचन व्हिटामीन बी-१२ नसल्यामुळे उद्भवते. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे जिभेला सूज येणं आणि इतर वेदनाही उद्भवतात. हातापायांना सूज येणं हे व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेचे लक्षण आहे. यामुळे मानसिक समस्याही उद्भवतात.
रोज किती व्हिटामीन बी-१२ आवश्यक असतं? (Daily Need Of Vitamin B-12 Food)
व्हिटामीन बी-१२ चे प्रमाण वय, लिंग आणि अन्य स्थितीवर अवलंबून असते. वयस्कर लोकांना रोज जवळपास २.४ मायक्रोग्राम व्हिटामीन बी-१२ ची आवश्यकता असते. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी रोज जवळपास २.६ मायक्रोग्राम व्हिटामीन बी-१२ ची आवश्यकता असते. गॅस्टोइटेस्टायल प्रोब्लेम्स असलेल्या लोकांना या व्हिटामीन्सची आवश्यकता जास्त असते.