Join us   

रोज फक्त १ लाडू खा; वाढलेली शुगर कंट्रोलमध्ये येईल; घरगुती 'एंटी डायबिटीक' लाडूंची खास रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 9:07 AM

Anjeer ladoo recipe (Fig Benefits For Diabetes) : या लाडूंमध्ये नॅचरल शुगर असते. ज्यामुळे शुगर लेव्हल बॅलेन्स राहण्यास मदत होते.

ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल (Blood Sugar Control) करण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या प्रकारची औषधांवर अवलंबून राहावं लागतं. याशिवाय स्ट्रिक्ट डाएटही फॉलो करावं लागतं. (Anjeer For Diabetes Diabetic Friendly) या आजारात साखर, तांदूळ खाण्यावर बंधन घातली जातात. तब्येतीचे विकार उद्भवू नयेत म्हणून काही घरगुती उपाय करायला हवेत. (Anjeer For People With Diabetes) ज्यामुळे शुगर लेव्हल बॅलेन्स राहील अंजीर लाडूचे घरच्याघरी तुम्ही सेवन करू शकता. डेली डाएटमध्ये याचा समावेश करून तुम्ही ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवू शकता. (Anjeer Ladoo Good For Diabetes)

अंजिरातील एंटी ऑक्सिडेंट्स आणि दाहक विरोधी गुणधर्मांमुळे इंसुलिन स्त्राव वाढून डायबिटीस कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. (Ref) आयुर्वेदानुसार २ ते ३ भिजवलेल्या अंजिराचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी केल्यास आतड्यांची  हालचाल वाढून बद्धकोष्टतेचा त्रासही कमी होतो. पचनक्रिया सुधारते कारण यात फायबर्स असतात. अंजिराचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असल्यामुळे याच्या सेवनाने इंसुलिन नियंत्रित होते आणि साखरेला पर्याय म्हणून तुम्ही अंजिराचे सेवन केल्यास कोणताही धोका उद्भवणार नाही.

अंजीर लाडू करण्यासाठी  लागणारं साहित्य (Anjeer Ladoo Making Tips/Fig Laddu)

1) अंजीर-  250 ग्राम

2) बदाम-  50 ग्राम

3) काजू- 50 ग्राम

4) खजूर-  100 ग्राम

5) साजूक सूप- 2 मोठे चमचे

6) वेलची- 1 छोटा चमचा

अंजिर लाडू करण्याची सोपी रेसिपी (Anjeer Ladoo Recipe)

१) सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात तूप घाला. त्यानंतर बदाम आणि काजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.

२) त्यानंतर कापलेले अंजिर आणि खजूर घाला. नंतर पुन्हा मऊ होईपर्यंत शिजवून  घ्या. त्यानंतर थंड झाल्यानंतर काही वेळासाठी तसंच ठेवून द्या. नंतर मिक्सरला लावून बारीक दळून घ्या. 

सकाळी भाजलेल्या लसणाची १ पाकळी खा; कोलेस्टेरॉल बाहेर निघेल-म्हातारपणातही निरोही राहाल

३)  हे मिश्रण कढईत घालून त्यात वेलची पावडर मिसळा आणि घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर थंड व्हायला बाजूला ठेवून द्या. त्यानंतर या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळून घ्या.

या लाडूंमध्ये नॅच्युरल शुगर असते. ज्यामुळे शुगर लेव्हल बॅलेन्स राहण्यास मदत होते. तुमची शुगर कंट्रोल होते. इतकंच नाही हाडंही मजबूत होतात. इम्यूनिटीसुद्धा बुस्ट होते ज्यामुळे आजारांपासून लांब राहण्यास मदत होते. अंजिरात व्हिटामीन सी, व्हिटामीन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि एंटी ऑक्सिडेंट्स यांसारखी पोषक तत्व असतात ज्यामुळे आजार दूर होण्यास मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्समधुमेहआरोग्य