"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी" ही म्हण आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रचलित आहे. फार पूर्वीपासून भारतीय आहारात तुपाचा समावेश केला जातो. आपल्याकडील भारतीय थाळीमध्ये तुपाला विशेष असे स्थान आहे. जेवणाच्या थाळीत तूप वाढल्याशिवाय भारतीय थाळी अपूर्णच आहे. आपल्याकडील प्रत्येक घरात घरगुती अस्सल तूप तयार केले जाते. घरी तयार केलेले हे अस्सल घरगुती तूप आरोग्याच्या दृष्टिने अतिशय पौष्टिक व औषधी असते. घरी बनवलेले हे तूप फक्त जेवणात खाण्यासाठीच नाही तर आरोग्यासंबंधित इतर समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.
आजवर आपण तुपाचे अनेक आश्चर्यकारक फायदे ऐकलेच असतील. नितळ काचेसारखी त्वचा हवी असेल किंवा दाट मुलायम केस हवे असतील तर आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितले जाते. शिवाय चेहरा व केसांच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी देखील तुपाचा वापर केला जातो. याचबरोबर रात्री झोपताना आपण बेंबी म्हणजेच पोटाच्या नाभीमध्ये काही थेंब तूप घातल्यास सुद्धा त्याचे अनेक चमत्कारिक लाभ आपल्याला मिळू शकतात(Apply Ghee On Your Belly Button Everyday To Reap These 7 Benefits).
पोटाच्या बेंबीमध्ये तुपाचे काही थेंब घालण्याचे नेमके फायदे काय आहेत?
१. बेंबीमध्ये तूप घातल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडण्यास मदत होते व परिणामी चेहऱ्यावर दिसणारे फोड, पिंपल हे सुद्धा दूर होतात.
२. बेंबी हा शरीराचा केंद्रबिंदू असल्याने इथे अन्य अवयवांना जोडून ठेवणारे अनेक ऍक्युप्रेशर पॉईंट असतात. त्यामुळे बेंबीमध्ये काही थेंब तूप टाकून मसाज केल्यास सांधेदुखीचा त्रास सुद्धा दूर होऊ शकतो.
वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...
३. बेंबीमध्ये तूप घातल्याने पोटदुखी व ओटीपोटात होणाऱ्या वेदना दूर होण्यास मदत होते. किंचित ओवा पावडर किंवा बारीक ओव्याचे दाणे सुद्धा तुपात मिसळून वापरू शकता याने पटकन आराम मिळतो. तसेच तुम्हाला पोट साफ न होण्याचा त्रास असले तर यावरही हा उपाय काम करू शकतो.
आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...
४. महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी हा तुपाचा उपाय रामबाण सिद्ध होऊ शकतो. यासाठी काही थेंब तूप बेंबीसह आपल्या ओटीपोटाच्या भागात सुद्धा लावून मसाज करू शकता.
५. पोटात गॅस तयार झाला असेल किंवा पोट दुखत असले तर बेंबीच्या आजूबाजूच्या भागात देशी तूप लावण्यासोबतच मसाज केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो आणि गॅसपासूनही सुटका मिळते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
६. नितळ त्वचा मिळवायची असेल तर रोज बेंबीत तुपाचे २ ते ३ थेंब टाकल्यास फायदा होईल. बेंबीत तूप लावल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत होण्यास मदत मिळते.
७. आयुर्वेदात असे मानले जाते की शरीराचे चक्र बेंबीपासूनच सुरू होते, म्हणूनच ते संतुलित ठेवण्यासाठी त्यावर तूप लावले जाते. यामुळे मज्जासंस्थाही संतुलित राहते.
घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...