Join us   

तुम्ही चुकीच्या पद्धतीने तर कांदा खात नाही? पाहा कांदा कच्चा खावा की शिजलेला; कशाने फायदा होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2024 2:16 PM

Are Onions Healthier Raw or Cooked? : योग्य पद्धतीने रोज कांदा खाल्ल्यास शरीराला फायदेच फायदे मिळतील..

कांद्याचा वापर अनेक भाज्यांमध्ये होतो (Onions). कांद्याशिवाय फोडणी अपूर्ण आहे. पदार्थात खांदा घालताच नवी चव येते. काही लोक कांदा शिजवून किंवा कच्चाच खातात (Health Tips). उन्हाळ्यात थकवा आणि डिहायड्रेशन सामान्य आहे. अशा स्थितीत उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आपण कांद्याचे सेवन करू शकता (Onion Health properties).

आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, 'बहुतांश लोक कांदा खाण्यात काही चुका करतात. उन्हाळा असो किंवा पावसाळा, प्रत्येक ऋतूत कांदा खाण्याचे फायदे आहेत. जर आपल्याला उष्माघाताचा त्रास होत असेल तर, आपण कांदा खाऊ शकता. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होईल'(Are Onions Healthier Raw or Cooked?).

शरीर थंड ठेवण्यासाठी उत्तम

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण कांदा खाऊ शकता. कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.  जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, सोडियम आणि पोटॅशियम देखील कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात.

जेवण बंद केले, कमी खाल्ले तरी वजन वाढते! वेट लॉससाठी खाणे गरजेचे कारण..

खाज आणि पुरळ यांपासून संरक्षण

कांद्यात आढळणारे क्वेर्सेटिन आणि सल्फर हे घटक शरीराला थंडावा देतात. क्वेर्सेटिन हा एक असा घटक आहे, जो हिस्टामाइन नावाचे रसायन कमी करते. ज्यामुळे कीटकांच्या चाव्याव्दारे ऍलर्जी, पुरळ आणि खाज येते. ही समस्या कांदाद्वारे दूर होते.

कांद्यातील पोषक तत्व

कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनॉल आणि सल्फर संयुगे यांसारखी फायटोकेमिकल्स आढळतात. हे घटक कांद्याचे अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म वाढवतात. ज्यामुळे शरीराला फायदेच मिळतात.

रक्तदाब नियंत्रणात राहते

अति उष्णतेमध्ये शरीराला सामान्य तापमान राखण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. यामुळे हृदय, फुफ्फुस आणि मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव पडतो. कांद्यामध्ये असलेले एलिल सल्फाइड्स रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि रक्त परिसंचरण सुधारते.

विराट कोहली-अक्षय कुमार खातात ‘तशा’ उकडून खा भाज्या, पोषण भरपूर देणाऱ्या ५ भाज्या

पोटातील गॅस आणि अपचन होईल दूर

कांदा पाचक एंझाइम सक्रिय करून पोटातील गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून बचाव करतात. कांद्यामध्ये भरपूर फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात. ते आपल्या आतड्यांमध्ये राहणाऱ्या चांगल्या जीवाणूंचे पोषण करतात आणि हे जीवाणू पचनासाठी आवश्यक असलेले लहान फॅटी ऍसिड तयार करतात.

रक्तातील साखर नियंत्रित राहील

कांद्यामध्ये आढळणारे क्रोमियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जर आपण मधुमेहग्रस्त रुग्ण असाल तर, आहारात कांद्याचा जरूर समावेश करा.

कांदा खाण्याची योग्य पद्धत

सलाडमध्ये कच्चा कांदा

कच्च्या कांद्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्ससह इतर पोषक तत्त्व असतात. जे शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. कच्च्या कांद्यामध्ये लिंबाचा रस, पुदिन्याची पाने, मीठ आणि काळी मिरी घाला आणि मिक्स करून खा. यामुळे शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतील.

कांद्याचा रायता

कांद्याचा रायता थंड आणि हायड्रेटिंग आहे, ज्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. बारीक चिरलेला कांदा दह्यात मिसळा, चिमूटभर मीठ, जिरेपूड आणि चिरलेली कोथिंबीर घाला. थंड करून सर्व्ह करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य