उन्हाळ्यात जेवणासोबत अनेक जण सॅलड खातात. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. व जेवण पचायला जड जात पौष्टीक तत्वांनी परिपूर्ण सॅलड शरीराला उर्जा तर देते, यासह शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे पण देते. सॅलडमध्ये काकडीचा समावेश असतोच. पण सॅलडमध्ये काकडीसोबत कोणते पदार्थ खाऊ नये हे आपल्याला माहित आहे का?
साधारणपणे लोकं सॅलड बनवताना अनेक भाज्या एकत्र करतात. पण टोमॅटोसोबत काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. रीवा येथील श्याम शाह मेडिकल कॉलेजच्या पोषणतज्ज्ञ रश्मी गौतम यांनी, हे फूड कॉम्बिनेशन आरोग्यासाठी कसे धोकादायक ठरत आहे याची माहिती दिली आहे(Are tomatoes and cucumbers bad together?).
टोमॅटोसोबत खाऊ नका काकडी
सॅलड बनवायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आधी काकडी आणि टोमॅटो येते. या भाज्यांशिवाय सॅलड अपूर्ण आहे. पण काकडी आणि टोमॅटोचे हे मिश्रण पोटाच्या संबंधित अनेक आजारांना आमंत्रित करू शकते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचन बिघडू शकते. यासह, शरीरातील ऍसिडिक पीएचचे संतुलनही बिघडवते. ज्यामुळे गॅस, पोट फुगणे, पोटदुखी, मळमळ, थकवा, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
वाढलेले वजन, सुटलेले पोट यावर १ उत्तम घरगुती उपाय, जिरे - बडीशेप पावडर - बघा करून..
टोमॅटो - काकडीचे हे कॉम्बिनेशन का धोकादायक आहे?
न्यूट्रिशनिस्ट रश्मी गौतम यांच्या मते, ''सॅलडमध्ये टोमॅटो आणि काकडी एकत्र केल्यास पोट खराब होण्याची शक्यता वाढते. दोघांची पचनाची वेळ वेगळी आहे. कारण एक अन्न आधी पचते आणि आतड्यात पोहोचते आणि दुसऱ्याची प्रक्रिया चालू राहते. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकते. ही प्रक्रिया पोटासाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळेच पोटाच्या निगडीत समस्या निर्माण होतात.
वजन कमी करायचंय, पोटावरची चरबी घटवायची तर करुन पाहा चिमूटभर दालचिनीचे ३ उपाय
काकडी बरोबर हे पदार्थ खाणे टाळा
काही जण टोमॅटोसोबत काकडीच नव्हे तर दहीही खातात. म्हणूनच कोशिंबीरमध्ये टोमॅटो आणि काकडीचे मिश्रण हानिकारक असू शकते. याशिवाय काकडी आणि दुधापासून बनवलेल्या गोष्टी एकत्र टाळाव्यात. असे केल्याने आरोग्याला मोठी हानी पोहचू शकते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने चयापचय मंदावते. ज्यामुळे पोट फुगणे आणि पोटदुखी यासारख्या समस्या वाढतात.