Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आजार पळतात की छळतात? वजनही वाढते? कधी -किती सुकामेवा खावा?

रोज ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आजार पळतात की छळतात? वजनही वाढते? कधी -किती सुकामेवा खावा?

Are You Overeating dry fruits? Side – Effects of consuming daily Dry fruits : हेल्दी म्हणून वाट्टेल तितके ड्रायफ्रुट्स खाऊ नका, पाहा सुका मेवा कधी आणि किती खावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 04:13 PM2023-12-22T16:13:18+5:302023-12-22T16:17:03+5:30

Are You Overeating dry fruits? Side – Effects of consuming daily Dry fruits : हेल्दी म्हणून वाट्टेल तितके ड्रायफ्रुट्स खाऊ नका, पाहा सुका मेवा कधी आणि किती खावे?

Are You Overeating dry fruits? Side – Effects of consuming daily Dry fruits | रोज ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आजार पळतात की छळतात? वजनही वाढते? कधी -किती सुकामेवा खावा?

रोज ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आजार पळतात की छळतात? वजनही वाढते? कधी -किती सुकामेवा खावा?

सुका मेवा (Dry Fruits) खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, म्हणून तज्ज्ञ सुकामेवा खाण्याचा सल्ला देत असतात. सुकामेव्यामध्ये आढळणारे गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. शिवाय शरीराच्या योग्य वाढीसाठी मदत करतात. मुख्यतः हिवाळ्यात सुका मेव्याचे लाडू मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. सुका मेवा खाण्याचे जितके सकारात्मक परिणाम आहे, तितकेच त्याचे दुष्परिणाम देखील आहेत (Health care). सुका मेवा अधिक प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणासह विविध प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात.

यासंदर्भात, सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे न्यूट्रीशन आणि डायटेटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. आयलीन केनेडी सांगतात, 'ड्रायफ्रूट्समध्ये फॅट, फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आढळते. नियमित सुकामेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय हृदयाचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी, वेट लॉस आणि बॅड कोलेस्टेरॉस कमी करण्यासाठी मदत करते. पण याच्या अतिसेवनामुळे वजन वाढणे, शिवाय पचनक्रियेत अडथळे येऊ शकते'(Are You Overeating dry fruits? Side – Effects of consuming daily Dry fruits).

अधिक प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाण्याचे नुकसान

पोटाचे विकार

फायबर शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे पोट निरोगी राहण्यास मदत होते. पण त्याच्या अतिसेवनामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता शिवाय पोटाचे इतर विकार छळू शकतात.

गव्हाची पोळी पचत नाही? पोट डब्ब होते, कणिक भिजवताना मिसळा ‘ही’ एक गोष्ट

झपाट्याने वाढते वजन

सुक्या मेव्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात, त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. जर आपण नियमित भरपूर ड्रायफ्रुट्स खात असाल तर, तुमचे वजन कमी वेळात झपाट्याने वाढू शकते.

दात खराब होऊ शकतात

सुक्या मेव्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. पण मनुका आणि खजूर यांसारख्या ड्रायफ्रुट्सचे अतिसेवन दातांसाठी हानिकारक ठरते. त्यामुळे याप्रकारच्या ड्रायफ्रुट्सचे सेवन कमी प्रमाणात करावे.

दमा

अतिप्रमाणात ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने दम्याचा त्रास होऊ शकतो. सुका मेवा सुरक्षित अधिक काळ टिकावे यासाठी सल्फर डायऑक्साइडचा वापर केला जातो. जे आरोग्यासाठी योग्य नाही.

सूर्यफूल की शेंगदाणा तेल? उत्तम आरोग्यासाठी कोणते तेल बेस्ट आणि का? तज्ज्ञ सांगतात..

एका दिवसात किती ड्रायफ्रुट्स खावे?

सुक्या मेव्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. जर आपण याचे सेवन अतिप्रमाणात करत असाल तर, याचे दुष्परिणाम आरोग्यावर दिसून येऊ शकते. त्यामुळे दिवसभरात १५ ते २० ग्रॅम ड्रायफ्रुट्स खा.

बदाम - ४ ते ५

अक्रोड - १ ते २

खजूर – १ किंवा २

पिस्ता - ५ ते ६.

Web Title: Are You Overeating dry fruits? Side – Effects of consuming daily Dry fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.