Join us   

कानात मळ झाला म्हणून कान कोरताय? हमखास होणाऱ्या ४ चुका टाळा, नाहीतर यायचा बहिरेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2023 11:22 AM

4 Mistakes Your Ears Want You To Stop Making कान दुखतो, कानात मळ झाला म्हणून घरच्याघरी उपाय करणं धोक्याचं

कानात मळ होतो, सर्दी झाली दडे बसतात. मळही होतोच. वेळोवेळी कान साफ करणे गरजेचं आहे. कानात मळ साचल्यानंतर कान दुखतोही. मात्र कान कोरण्याची सवय वाईट, घरच्याघरी मळ काढण्याचे, त्यासाठी कानात मनानेच कुठलंही तेल घालण्याचे किंवा कानात पीन घालून कोरण्याच्या उद्योगामुळे बहिरेपणाही येऊ शकतो. मात्र मळ झालाच तर हलक्या हातानं काही गोष्टी करता येतात. डॉक्टरांचा सल्ला मात्र वेळेत घ्या, कानाशी खेळ नको.

असे करु नका..

कॉटन स्वॅब वापरणे धोकादायक

बरेच लोकं कान साफ करण्यासाठी कॉटन स्वॅबचा वापर करतात. याने सहज कानातील मळ निघते. मात्र, याचा योग्य आणि नीट वापर होणे महत्त्वाचं. जर नीट वापर न झाल्यास कानातला मळ आतमध्ये ढकलला जातो, त्यामुळे कान फुटण्याचा धोका असतो.

या गोष्टी कानात घालू नका

अनेक लोक कान स्वच्छ करण्यासाठी टूथपिक्स, सेफ्टी पिन, चाव्या, हेअर क्लिप यासारख्या गोष्टी वापरतात, त्यामुळे कानाला दुखापत किंवा रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. यामध्ये कानाचा पडदा खराब होतो. ज्यामुळे आपल्याला ऐकायला देखील कमी येऊ शकते.

इअर कॅन्डल्सचा वापर टाळा

सध्या इअर कॅन्डल्सचा वापर अधिक प्रमाणावर होत आहे. याच्या वापराने कान स्वच्छ होतात. असा अनेकांचा समज आहे. परंतू हा सुरक्षित पर्याय नाही. यामुळे गंभीर स्वरूपाचे नुकसान होऊ शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइल