Join us   

सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो? डॉक्टर सांगतात १ उपाय, फ्रेश वाटेल- एनर्जेटीक राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 5:07 PM

Are you Waking Up With Body Pain Know Solution :

सकाळी उठल्यानंतर टाच दुखते  कंबर दुखते, अंग दुखतं, पाठ दुखते अशा तक्रारी अनेकांना उद्भवतात.  खासकरून महिलांमध्ये सकाळी उठल्यानंतर अंग गरम वाटतं किंवा स्नायू दुखतात असा त्रास होतो. वयाच्या तिशीनंतर इस्ट्रोजन आणि कॅल्सिटोनिन कमी होत जाते. ज्यामुळे हाडांमधला ऑस्टिओपॅरोसिस वाढतो. ज्यामुळे हाडं कमकुवत होतात. अंगातील कॅल्शियम कमी होऊ लागते.(Are you Waking Up With Body Pain Doctor Said 5 Reasons And Solution For Body Pain)

सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवण्याची कारणं

एनिमियामुळे ही स्थिती उद्भवते. रक्ताची कमतरता भासल्यास शरीरातील टिश्यूजपर्यंत ऑक्सिजन घेऊन जाणारे हेल्दी रेड ब्लड  सेल्स  कमी होतात. अशा स्थितीत व्यक्तीला थकवा जाणवतो. शरीराचे वजन जास्त असल्यामुळे पाठ, मानेवर दबाव येतो. या कारणामुळे श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकता ज्यामुळे झोप यायला त्रास होतो. याशिवाय मूड आणि हेल्थवरही याचा परिणाम होतो. चांगल्या झोपेची शरीराला फार आवश्यकता असते.

जर झोपताना आरामदायक गादी वापरली नाही तर याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. रात्रभर चुकीच्या स्थितीत झोपल्यामुळे अंगदुखी उद्भवते. जसं की पोटावर झोपणं, डोक्याखाली हात ठेवून झोपणं, जास्त उंच उशीचा वापर, शरीराच्या अवयवांवर भार देऊन झोपणं यासारख्या चुकीच्या स्लिपिंग पोझिशन्समुळे या समस्या उद्भवतात.

व्हिटामीन डी  शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. याच्या कमतरतेमुळे हायपरकॅल्शिमिया किंवा  रक्तात कॅल्शियमची कमतरता उद्भवते. व्हिटामीन डी कॅल्शियम अवशोषित करण्यास मदत करते. ज्यामुळे मांसपेशी चांगल्या राहतात.

सकाळी उठल्यानंतर येणारा थकवा, अंगदुखी टाळण्यासाठी डॉक्टर काय सांगतात?

आयुर्वेदाचार्य डॉ. मानसी मेहेंदळे सांगतात की, हे टाळण्यासाठी मसल्स स्ट्रेंथ वाढवणं खूप गरजेचं आहे. फक्त कॅल्शियम वाढवण्याचा विचार केला तर किडनीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो.  आपल्या हाडांभोवती मसल्सचे आवरण असते. मसल्स स्ट्राँग करण्यासाठी  रोज व्यायाम करायला हवा.

संपूर्ण अंगाला तेलानं मसाज करा. ज्यामुळे मसल्स स्टिफनेस  दूर होतो आणि आपोआप तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. बोन्स चांगले राहतात आणि इतर सगळ्या तक्रारी कमी होऊन तुमच्या शरीरात ताकद येते. हाडांमधल्या वेदनाही कमी होतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स