Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दात दुखत आहेत? ५ घरगुती उपाय, दात वेळेवर सांभाळा नाहीतर..

दात दुखत आहेत? ५ घरगुती उपाय, दात वेळेवर सांभाळा नाहीतर..

5 Home and Natural Remedies for Toothache Pain दातांच्या दुखण्यामुळे व्यक्ती हैराण होऊन जातो. अशा परिस्थितीत ५ घरगुती उपाय देतील आराम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2023 03:26 PM2023-01-24T15:26:45+5:302023-02-07T14:57:57+5:30

5 Home and Natural Remedies for Toothache Pain दातांच्या दुखण्यामुळे व्यक्ती हैराण होऊन जातो. अशा परिस्थितीत ५ घरगुती उपाय देतील आराम..

Are your teeth hurting? 5 home remedies, take care of your teeth on time or else.. | दात दुखत आहेत? ५ घरगुती उपाय, दात वेळेवर सांभाळा नाहीतर..

दात दुखत आहेत? ५ घरगुती उपाय, दात वेळेवर सांभाळा नाहीतर..

आपल्या चेहऱ्याची शोभा वाढवण्यात दात महत्वाची बाजू पाहते. एका स्माईलमुळे आपला चेहरा खुलून दिसतो. मात्र, काहीवेळा दातांचा त्रास असहाय्य होतो. दातांचे दुखणे वाढत जात असेल, तर त्यावर त्वरित लक्ष देणं महत्वाचे आहे. दातदुखी हा लपलेला शत्रू असतो. एकदा का जर दातांची समस्येला सुरुवात झाली की, धष्ट पुष्ट पहिलवान देखील लहान मुलासारखा रडू लागतो.

दातांच्या दुखण्यावर त्वरित लक्ष न दिल्यास इजा पोहचण्याची शक्यता निर्माण होते. अशा परिस्थितीत दातांवर इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. दात दुखल्यानंतर खाण्या - पिण्याची अडचण होते. दातांचे दुखणे वाढले की सूज निर्माण होते. दात दुखीचा त्रास वाढत गेला तर, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक. जर आपल्याला घरगुतीरित्या दातांच्या दुखण्यापासून आराम हवा असल्यास काही टिप्स फॉलो करा. याने नक्कीच आपल्याला आराम मिळेल.

कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा

हलकीशी दातदुखी होत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे हा उत्तम उपाय ठरेल. मीठ हे डिसइनफेक्टन्ट असल्यामुळे दातांमधील किडे मारण्यास मदतगार आहे. हा घरगुती नुस्खा दिवसातून २ ते ३ वेळा रिपीट करा.

बेकिंग सोडा पेस्ट

दातांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. यासाठी टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिसळा. व त्या टूथपेस्टने ब्रश करून घ्या. असं केल्याने दात - दाढीतील दुखणं कमी होईल. ही प्रक्रिया दिवसातून २ वेळा करा.

बर्फ करेल मदत

शरीरातील प्रत्येक सूज कमी करण्यासाठी बर्फ मदत करते. जर आपल्या दाढेवर अथवा दातांवर सूज निर्माण झाली असेल, तर त्या भागावर आईसपॅकने शेक द्या. आपण ही प्रक्रिया दिवसातून २ ते ३ वेळा करू शकता. याने सूज कमी होईल, यासह आराम मिळेल.

लसणाच्या कळ्या चावा

जखम बरी करण्यासाठी लसूण वापरण्यात येते. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. दातांचे दुखणे कमी करण्यासाठी आपण लसणाचा वापर करू शकता. लसणाची पेस्ट तयार करून दातांवर लावा, अथवा कच्च्या लसणाच्या कळ्या चावून रस दुखणाऱ्या दातांवर ठेवा. असं केल्याने दातांना आराम मिळेल.

लिंबू व हिंग

लिंबू अनेक कारणांसाठी वापरण्यात येतो. लिंबात व्हिटामिन सी असते. दातदुखीपासून जात असाल तर, दातदुखीच्या जागेवर लिंबाच्या चकत्या ठेवा. हा उपाय केल्याने दातांना आराम मिळेल. आपण त्या ऐवजी हिंगचा देखील वापर करू शकता. यामध्ये दातदुखी करणारे गुणधर्म आढळतात. बॅक्टेरियामुळे सडणाऱ्या दातांना वाचविण्यासाठी हिंगचा वापर करा.

Web Title: Are your teeth hurting? 5 home remedies, take care of your teeth on time or else..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.