Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Army Trick for Sleep : 2 मिनिटांत ढाराढूर झोपण्याची आर्मी टेक्निक; पडल्या पडल्या येईल शांत झोप

Army Trick for Sleep : 2 मिनिटांत ढाराढूर झोपण्याची आर्मी टेक्निक; पडल्या पडल्या येईल शांत झोप

Army Trick for Getting to Sleep : ४ लाख ४० हजार लोकांवर झालेल्या एका अभ्यासातून दिसून आलं की, जवळपास ३५ टक्के लोक रात्रीच्यावेळी कमी झोपतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 04:55 PM2022-03-22T16:55:41+5:302022-03-23T11:48:49+5:30

Army Trick for Getting to Sleep : ४ लाख ४० हजार लोकांवर झालेल्या एका अभ्यासातून दिसून आलं की, जवळपास ३५ टक्के लोक रात्रीच्यावेळी कमी झोपतात.

Army Trick for Getting to Sleep : How to fall asleep in two minutes military secret us army tactic | Army Trick for Sleep : 2 मिनिटांत ढाराढूर झोपण्याची आर्मी टेक्निक; पडल्या पडल्या येईल शांत झोप

Army Trick for Sleep : 2 मिनिटांत ढाराढूर झोपण्याची आर्मी टेक्निक; पडल्या पडल्या येईल शांत झोप

सध्याच्या स्थितीत असे अनेक लोक आहेत ज्यांना रोजच्या झोपेसाठी त्रासाचा सामना करावा लागतो.  स्लिप डिसॉर्डरशी सामना करत असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.(Sleep Problems)  इन्सोम्निया  म्हणजेच अनिद्रेचा त्रास अनेकांना उद्भवत आहे. (How to fall asleep faster) अमेरिकन स्लीप एसोसिएशननुसार संपूर्ण  जगभरातील लोकांना  शॉर्ट टर्म इनसोम्निया आणि क्रोनिक इनसोम्नियाची लक्षणं उद्भवतात. (How to fall asleep in two minutes military secret us army tactic)

४ लाख ४० हजार लोकांवर झालेल्या एका अभ्यासातून दिसून आलं की, जवळपास ३५ टक्के लोक रात्रीच्यावेळी कमी झोपतात. झोप कमी झाल्यानं लठ्ठपणा, हृदयरोग, डायबिटीस यांसारखे आजार होण्याचा धोका वाढतो.  म्हणून या लेखात झोपेच्या समस्या टाळण्यासाठी युएएस आर्मीची एक खास टेक्निक सांगणार आहोत. 

वय कमी पण चेहरा वयस्कर वाटतो? ५ फेशियल योगा प्रकार, आयुष्यभर येणार नाहीत सुरकुत्या

द इंडिपेंडंटमध्ये यूएसए आर्मीद्वारे वापरात असलेली ही जुनी टेक्निक नमुद करण्यात आली.  अमेरिकन सेना युद्ध किंवा खास स्थितीत या टेक्निकचा वापर करत होती. या टेक्निकचा उल्लेख पहिल्यांदा रिलॅक्स एंड विन चॅम्पियनशिप परफॉर्मेंसमध्ये  बाय लॉयड बड विंटर या पुस्तकात करण्यात आला. 

काय आहे ही ट्रिक?

या ट्रिकमध्ये मुख्य स्वरूपात मांसपेशींचा आराम, श्वास व्हिज्यूअलायलेशन ट्रिक्सचा समावेश आहे. यासाठी सगळ्यात आधी आपल्या अंथरूणाच्या किनारी बसा. यावेळी आपली बेडसाईड लाईट ऑन ठेवा, फोन सायलेंटवर ठेवा आणि सकाळी अलार्म सेट करा.  आता आपल्या त्वचेच्या पेशींना आराम द्या.

उन्हाळी लागणं २ मिनिटात बंद करतील ५ सोपे उपाय; जळजळ, खाज अवघड जागेचं दुखणं कायमचं राहिल लांब

सगळ्यात आधी चेहरा टाईट करा मग हळूहळू सैल सोडा. जेव्हा तुम्हाला चेहरा निस्तेज वाटेल तेव्हा आपले खांदे  नैसर्गिकरित्या खालच्या बाजूनं  जाऊ द्या.  असं करताना श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आपल्या श्वासांचा आवाज ऐका.  छाती आणि शरीराचा खालचा भाग रिलॅक्स ठेवा. डोक्यात जे काही विचार स्वाभाविकपणे येतील त्यांना येऊ द्या. काही सेकंदानंतर तुमचं डोकं आपोआप शांत होईल. 

व्हिज्यूअलायजेशन

डोळे बंद करून व्हिज्यूअलायजेशनवर लक्ष द्या. तुम्ही निळ्या आकाशाखाली एक शांत तलावात झोपले आहात. नंतर शांत वातावरणात झोके घेत आहात असा विचार करा.  हे करायला तुम्हाला २ मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागेल. आता बेडवर झोपून लाईट्स बंद करा. काही मिनिटातचं तुम्हाला चांगली झोप येईल.  सुरूवातीला तुम्हाला असं वाटू शकतं की ही टेक्निक काही खास काम करत नाहीये पण नवव्या दिवसापासून तुम्हाला टेक्निकची सवय होईल आणि खूप फ्रेश वाटेल.

Web Title: Army Trick for Getting to Sleep : How to fall asleep in two minutes military secret us army tactic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.