Join us   

World Asthma Day : श्वास घेता येत नाही, सतत धाप लागते? नियमित खा ६ गोष्टी, अस्थमा असेल तर मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2023 12:54 PM

World Asthma Day : अस्थमाचा त्रास लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना होतो. आहारविहार योग्य आणि डॉक्टरचा सल्ला महत्त्वाचे ठरते.

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक अस्थमा दिन साजरा करण्यात येतो. (world asthma day) हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू, अस्थमा किंवा दमासारख्या श्वसनाच्या आजारांबाबत जनजागृती करणे हा आहे. या आजाराचा त्रास लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. यामध्ये फुफ्फुसातील लहान वायुमार्ग आकुंचन पावतात आणि सूज येते. त्यामुळे रुग्णाला खोकला, धाप लागणे, छाती जड होणे अशी लक्षणे जाणवू लागतात.

यासंदर्भात, डायरेक्टर ऑफ फॅट टू स्लिम आणि न्यूट्रिशनिस्ट व आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, 'प्रदूषण आणि अस्थमासारख्या श्वसनाच्या आजारांमुळे, फुफ्फुसांचे गंभीर नुकसान होते. फुफ्फुस स्वच्छ आणि मजबूत करण्यासाठी, अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असलेले पदार्थांचे सेवन करणे गरजेचं आहे. हे ६ पदार्थ  श्वासोच्छ्वास चांगला व्हायला उपयुक्त ठरतात’(Asthma and Your Diet: What to Eat and What to Avoid).

काय खाणे योग्य?

आले

खोकला आणि सर्दी झाल्यानंतर आपल्याला आलं खाण्याचा सल्ला मिळतो. आल्यामध्ये दाहक - विरोधी गुणधर्म आढळतात. जे श्वसनमार्गातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. आल्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, बीटा-कॅरोटीन आणि जस्त यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

रोज सायंकाळी चहा पिता? आरोग्यासाठी अतिशय त्रासदायक कारण...

हळद

हळद श्वसनाच्या निगडीत असणारे आजार व फुफुसंमध्ये जमा होणारा कफ कमी करण्यास मदत करते. हळदीतील सक्रिय संयुगे नैसर्गिकरित्या फुफ्फुस स्वच्छ करतात. शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी हा सर्वोत्तम मसाला आहे.

मध

मधात नैसर्गिक गोडवा आढळतो. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असल्याने, ते श्वसन समस्या कमी करण्यास मदत करते.

वाढलेले वजन, सुटलेले पोट यावर १ उत्तम घरगुती उपाय, जिरे - बडीशेप पावडर - बघा करून..

लसूण

लसणामध्ये ॲलिसिन नावाचे शक्तिशाली संयुग असते, जे प्रतिजैविक एजंट म्हणून कार्य करते. हे श्वसन संक्रमण बरे करण्यास मदत करते. रक्तसंचय आणि श्वासोच्छवासाचा त्रास कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. यासह जळजळ आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.

ग्रीन - टी

वजन कमी करण्यापासून ते जळजळ व शरीरातील सूज कमी करण्यासाठी ग्रीन - टी उपयुक्त ठरते. ग्रीन - टीचे अनेक आयुर्वेदिक उपाय आहेत. दिवसातून २ वेळा ग्रीन - टी प्यायल्याने फुफुसांसाठी फायदेशीर ठरते.

हेल्दी चरबीयुक्त पदार्थ खा

फुफ्फुस स्वच्छ करण्यासाठी आहारात अशा पदार्थांचा समावेश करा, ज्यात कमी कार्बोहायड्रेट आणि अधिक निरोगी चरबी असेल. असे पदार्थ खाल्ल्याने फुफ्फुस निरोगी व मजबूत राहतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स