बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेक जण फास्ट फूड (Fast Food) किंवा तेलकट पदार्थांच्या आहारी जात आहेत. जास्त प्रमाणात तेलकट किंवा फास्ट फूड खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉलची (Cholestrol) पातळी वाढते. यासह वजन देखील वाढते. कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ आहे, जो शरीराच्या सर्व पेशींमध्ये आढळतो. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की, ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे हृदय व इतर गंभीर आजारांचे शिकार आपले आरोग्य होते.
जर आपल्याला हाय कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर, सॅच्युरेटेड फॅट आणि तेलकट पदार्थ टाळणे गरजेचं आहे. मात्र, सणासुदीच्या काळात कितीही कण्ट्रोल केलं तरी, तेलकट पदार्थ आपण खातोच. जर तेलकट पदार्थ खाऊनही बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर, तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काही खास टिप्स फॉलो करून पाहा(Ate Oily Food? Do This To Prevent The Aftereffects).
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काय करावे?
मायउपचार या वेबसाईटनुसार, 'तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर नेहमी कोमट पाणी प्यावे. यामुळे आतडे, यकृत आणि पोटही निरोगी राहील, व तेलामुळे होणारी हानी टाळता येईल. आपण कोमट पाण्यात मध घालून पिऊ शकता. कोमट पाण्यात मध घालून प्यायल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. यासह हृदयाच्या निगडीत असणारा धोकाही कमी होतो. व हाय ब्लड प्रेशरची समस्याही कमी होते. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पदार्थ खाणं टाळावे. कारण याचा थेट दुष्परिणाम यकृत, पोट आणि आतड्यांवर होतो.
नाश्त्याला इडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? त्यासाठी कधी आणि किती प्रमाणात इडली खावी?
शतपावली करा
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर एकाच जागेवर बसू नका. शतपावली करा. यामुळे अतिरिक्त कॅलरीज कमी करण्यास मदत होईल. आयुर्वेदानुसार तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर मधाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. याशिवाय आपण मधासोबत काळी मिरी पावडर दिवसातून दोन ते तीन वेळा खाऊ शकता.
रोज सकाळी नकळत ५ चुका होतात आणि वजन वाढायला लागते, पाहा नेमके काय चुकते?
ऑलिव्ह किंवा सूर्यफुल तेलाचा वापर करा
जर आपल्याला तेलकट पदार्थ आवडत असेल तर, पदार्थ तळण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा सूर्यफूल तेलाचा वापर करा. ऑलिव्ह ऑईल किंवा सूर्यफूल तेल आरोग्यासाठी हानिकारक नाही. मात्र, तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर कोमट पाणी नक्कीच प्या. यासह आपल्या मुलांना कोमट पाणी पिण्याची सवय लावा. ज्यामुळे भविष्यातील अनेक गंभीर आजार टाळण्यास मदत होईल.