उन्हाळ्यात आपल्याला खूप तहान लागते आणि पाणी-पाणी होते, थंडीच्या दिवसांत हवेतील तापमान कमी असल्याने आपल्या शरीराची जास्त ऊर्जा खर्च होते, त्यामुळे आपल्याला खूप भूक लागते. पण पावसाळ्याच्या दिवसांत आपल्या शरीरातील अग्नी मंद झाल्याने त्याचा संपूर्ण पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे भूक कमी लागणे, खाल्लेले योग्य पद्धतीने न पचणे, गॅसेस, अॅसिडीटी, बद्धकोष्ठता असे पचनाशी निगडीत त्रास डोके वर काढतात. गॅसेसचा त्रास एकदा सुरू झाला की आपल्याला काही सुधरत नाही कधी हा गॅस पोटात फिरत राहिल्याने पोटदुखी होते, तर कधी करपट ढेकर येऊन गॅसेस बाहेर पडतात. बरेचदा हा गॅस मागच्या बाजुनेही बाहेर पडतो. मात्र पोटात साचलेला गॅस बाहेर पडला नाही तर आपल्याला अस्वस्थ होत राहते आणि काय करावे ते कळत नाही.
आता हवेतील दमटपणाचा शरीरावर परिणाम होतो हे जरी ठिक असले तरी आहाराच्या माध्यमातून आपण हा त्रास कमी करु शकतो. या काळात आहारात काही ठराविक बदल केल्यास गॅसेसपासून मुक्तता मिळण्याची शक्यता असते. यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा हे समजून घेणे आवश्यक आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी (Anjali Mukharjee) या आपल्या फॉलोअर्सना विविध विषयावर माहिती देऊन कायम आहाराबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी नुकतीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी गॅसेस होऊ नयेत यासाठी आहारात कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल सांगितले आहे. आपण आहाराची आणि पोटाची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर आपल्याला गॅसेसची तक्रार उद्भवणार नाही. पाहूयात असे कोणते पदार्थ आहेत जे टाळल्यानी गॅसेसचा त्रास कमी होऊ शकतो (Avoid 15 Foods Items for Gas Problems).
१. तळलेले पदार्थ
२. वांगे
३. मैदा
४. काकडी
५. कोबी
६. फ्लॉवर
७. सोयाबिन
८. यिस्ट
९. दूध
१०. हरभरा डाळ आणि राजमा
११. मटार
१२. मुळा
१३. सुकामेवा, दाणे
१४. पेस्ट्री
१५. अल्कोहोल