Join us   

दही खाताना या चुका टाळा; अन्यथा फायदा होण्याऐवजी होईल नुकसान, वाचा दही खाण्याचे ४ नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:10 PM

Avoid 4 Mistakes While Eating Curd : दही खाण्याचे ४ सोपे नियम माहीत करून घेतल्यास तब्येत उत्तम राहण्यास मदत होईल. 

दुपारच्या जेवणात दही लागतंच असे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. दही खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली राहते. शरीरातील उष्णता कमी होते. दही खाण्याचे काही बेसिक नियम समजून घेतल्यास तब्येतीला पुरेपूर फायदा मिळेल. (Avoid making these mistakes while eating curd) दही खाण्याचे ४ सोपे नियम माहीत करून घेतल्यास तब्येत उत्तम राहण्यास मदत होईल. 

दही रात्रीच्यावेळी खाऊ नये

दही रात्री खाऊ नये. रात्री दही खाल्ल्याने शरीरात जास्त प्रमाणात कफ तयार होतो, ज्यामुळे छातीत जंतुसंसर्ग आणि त्वचेच्या समस्यांचा धोका वाढतो.

मासांहारासह दही खाणं टाळा

तुम्ही जर मांसाहाराचे शौकीन असाल तर तुम्ही ही चूक नक्कीच करत आहात. चिकन असो की चिकन बिर्याणी, त्यासोबतची रायत्याची चव तुमचे आरोग्य बिघडू शकते. जर तुम्ही ही चूक करत राहिलात तर कधीही तुमचे शरीर सोरायसिस, संधिवात आणि फोड .येण्यासारख्या समस्यांना बळी पडू शकते.

दूधासह दही खाताना या चुका टाळा

दही दुधापासूनच बनवले जात असले तरी ते एकत्र खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कारण त्याचा प्रभाव एकमेकांपासून पूर्णपणे वेगळा असतो. जर तुम्ही दोन्ही एकत्र किंवा लगेच केले तर काळजी घ्या, यामुळे पोट खराब होऊ शकते तसेच सांधेदुखीसह जळजळ होऊ शकते.

दही आणि फळांची स्मूदी

लोक YouTube वर बघून वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करतात., दही आणि फ्रूट स्मूदी एकत्र खाऊ नका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चकचकीत फोडांसह छातीत संसर्ग होऊ शकतो. दह्यामध्ये जरी अनेक पौष्टिक घटक असतात, परंतु दररोज सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही ते खूप जड आणि आंबलेले असते. ज्या लोकांना लॅक्टोजची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी रोज दही खाणे त्रासदायक ठरू शकते.

टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स