Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यात फूड पॉयझनिंग टाळण्याचे ६ सोपे उपाय, जपून राहा -पोट सांभाळा...

पावसाळ्यात फूड पॉयझनिंग टाळण्याचे ६ सोपे उपाय, जपून राहा -पोट सांभाळा...

How To Avoid Food Poisoning In Monsoon : पाणी, बाहेरचे अन्नपदार्थ यामुळे पावसाळ्यात पोट बिघडू शकते, वेळीच व्हा सावधान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 07:41 PM2023-06-29T19:41:08+5:302023-06-29T20:02:54+5:30

How To Avoid Food Poisoning In Monsoon : पाणी, बाहेरचे अन्नपदार्थ यामुळे पावसाळ्यात पोट बिघडू शकते, वेळीच व्हा सावधान...

Avoid Food Poisoning During Monsoon With These 6 Simple Tips | पावसाळ्यात फूड पॉयझनिंग टाळण्याचे ६ सोपे उपाय, जपून राहा -पोट सांभाळा...

पावसाळ्यात फूड पॉयझनिंग टाळण्याचे ६ सोपे उपाय, जपून राहा -पोट सांभाळा...

बरेचदा आपल्याला पावसाळ्यात इतर आजारांसोबतच 'फूड पॉयझनिंग' होण्याची देखील शक्यता असते. पावसाळ्यात फूड पॉयझनिंग होणे ही एक सामान्य समस्या आहे. पावसाळ्यात उलटी, झुलाब, पोटदुखी, फंगल इंन्फेक्शन यांसारखे अनेक छोटे - मोठे आजार होतंच असतात. शक्यतो पावसाळ्यात बाहेरचे अस्वच्छ किंवा उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला 'फूड पॉयझनिंग' होऊ शकते. हवामान बदलले की अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्न लवकर खराब होते. असे अन्न नकळत खाल्ल्याने अनेक वेळा अन्नातून विषबाधा होण्याची समस्या निर्माण होते.

खरंतर, अन्नातून विषबाधा कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकते, परंतु पावसाळ्यात त्याचे प्रमाण अधिक वाढते. पावसाळ्यात वातावरणात इतका ओलावा असतो की वाईट बॅक्टेरिया अन्नातून सहज पसरतात. हे बॅक्टेरिया अन्न दूषित करतात आणि असे अन्न आपल्या पोटात जाऊन आपल्याला आजारी बनवतात. काहीवेळा काही परिस्थितीमध्ये आपण 'फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून नैसर्गिक उपायांनी किंवा औषधांनी आराम मिळवू शकतो. परंतु काही प्रकरणे गंभीर असू शकतात आणि रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. यासाठीच पावसाळ्यात 'फूड पॉयझनिंग' होऊ नये म्हणून स्वतःची अशी घ्या काळजी(Avoid Food Poisoning During Monsoon With These 6 Simple Tips).

पावसाळ्यात 'फूड पॉयझनिंग' होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी... 

१. शिळे अन्न खाणे टाळा :- पावसाळ्यात शिळे अन्न कधीही खाऊ नये. कारण शिळ्या अन्नात बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात. विशेषतः पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे जीवाणू अन्नाला चिकटून राहू शकतात. ज्यामुळे आपल्याला अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे या ऋतूत शिळे अन्न खाणे टाळावे.

मासिक पाळीत झोपच येत नाही? पोटदुखी-हेवी ब्लिडिंग? ८ सोप्या गोष्टी, झोपा शांत...

२. अर्धवट शिजवलेले अन्न खाणे टाळा :- अर्धवट शिजवलेले अन्न कधीही खाऊ नका. कारण बाहेरून आणलेल्या भाज्या किंवा मांसाहारी वस्तूंवर बॅक्टेरिया आधीच असतात. जेव्हा आपण हे बाहेरून विकत आणलेले अन्नपदार्थ योग्य प्रकारे शिजवत नाही, तेव्हा हे बॅक्टेरिया मरत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला  'फूड पॉयझनिंग' होऊ शकते. उच्च-तापमानावर अन्न शिजवणे आणि असे संपूर्णपणे शिजलेले अन्न खाणे हा उत्तम पर्याय आहे. 

३. फळे व भाज्या नीट धुवून स्वच्छ करा :- जर आपण पावसाळ्यात फळे किंवा भाज्या खात असाल तर आधी ते पूर्णपणे स्वच्छ करा. कारण पावसात विषाणू आणि बॅक्टेरिया सहजपणे त्यावर जाऊन चिकटतात. जर तुम्ही फळे किंवा भाज्या न धुता खाल्ले तर ते बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाऊ शकतात. पावसाळ्यात फळे व भाज्या स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या फळ व भाज्या धुण्याचे लिक्विड देखील वापरू शकता.

सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...

४. स्वयंपाकघराची स्वच्छता आवश्यक :- पावसाळ्यात स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे असते. कटिंग बोर्ड, चाकू आणि भांडी वापरायच्या आधी व नंतर कायम स्वच्छ करूनच वापरत रहा. यामुळे आपले स्वयंपाकघर बॅक्टेरिया आणि विषाणूंपासून मुक्त राहील. यामुळे आपण 'फूड पॉयझनिंगची' समस्या टाळू शकता. 

५. कापून ठेवलेली फळे खाऊ नका :- पावसाळ्यात ठेल्यावर मिळणारी आधीच कापून ठेवलेली फळे खाणे टाळावे. आधीच कापून ठेवलेल्या फळांवर बॅक्टेरिया चिकटू शकतात, ज्यामुळे ते आपल्या पोटात जाऊन आपल्याला आजारी बनवू शकतात. जेव्हा आपल्याला फळांचे सेवन करायचे असेल तेव्हा फळे ताजी व नुकतीच कापली आहेत, अशी फळ खाण्याला प्राधान्य द्यावे. 

६. उघड्यावरचे स्ट्रीट फूड खाणे टाळा :- रस्त्याच्या कोपऱ्यावर मिळणारे स्ट्रीट फूड खाणे शक्यतो टाळावे. याचे मुख्य कारण म्हणजे हे स्ट्रीट फूड उघड्यावर  विकायला ठेवले असल्याने त्यावर बॅक्टेरिया असण्याची शक्यता जास्त असते. जर आपण हे अन्न खाल्ले तर आपल्याला फूड पॉयझनिंग देखील होऊ शकते. तसेच इतर आजारांचा देखील धोका असू शकतो.

Web Title: Avoid Food Poisoning During Monsoon With These 6 Simple Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.