Join us   

पावसाळ्यात शिळं अन्न खाताय? किती तासांनी पदार्थ खाल्ले तर फूड पॉयझनिंगचा धोका, आजारांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2024 2:46 PM

Avoid food poisoning during monsoon with these simple tips : पावसाळ्यात फ्रिजमध्ये ठेवलेले, शिळे पदार्थ खावे का?

देशातील बहुतांश ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे (Monsoon Health Tips). पावसाळा सुरु झाला आहे. या दिवसात आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी. पावसाळा हा लोकांसाठी आनंददायी मानला जातो, मात्र या ऋतूत लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते (Food Poisoning). विशेषत: खाण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. बरेच लोक दिवसातून एकदा स्वयंपाक करतात, आणि रात्रीपर्यंत तेच अन्न पुन्हा गरम करून खातात. पण पावसाळ्यात ही चूक करू नये.

यासंदर्भात, आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा सांगतात, 'पावसाळ्यात तापमान कमी होते आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. अशा वातावरणात विषाणू, बॅक्टेरिया आणि बुरशी वेगाने वाढू लागतात. यामुळेच पावसाळ्यात फ्रेश अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये.या ऋतूत अनेक पदार्थ लवकर खराब होतात. असे पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार वाढतात.(Avoid food poisoning during monsoon with these simple tips).

५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल

फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाणे टाळावे

स्वयंपाक केल्यानंतर लोक ते फ्रिजमध्ये ठेवतात आणि नंतर खातात. दोन-दोन दिवस किंवा जास्तही दिवस काहीजण पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात. असे शिळे, गार पदार्थ खाऊ नयेत. गरम ताजे अन्न खावे. याशिवाय पावसाळ्यात स्वयंपाक करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खाव्यात. कोमट पाण्यात मीठ घालून भाज्या स्वच्छ धुवून घ्या.

पोटाचे विकार ते निस्तेज त्वचा; दह्यात मिसळून खा ४ गोष्टी, पावसाळ्यातही तक्रारी राहतील लांब

बाहेरचे अन्न टाळावे

पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे अन्न खाणं टाळावे. या दिवसात शरीरातील चयापचय क्रिया मंदावते आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे लोकांनी चयापचय आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आहारात आले, लसूण आणि लिंबू यांचा समावेश करावा. निरोगी जीवनशैलीला फॉलो करा. आजारी किंवा पोटाची तक्रार आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स : मोसमी पाऊसहेल्थ टिप्सआरोग्य