Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री वरण खाल्लं की सकाळी पोटात गुडगुड? डाळ पचतच नाही? ३ टिप्स - पोटात गॅस होऊ नये म्हणून..

रात्री वरण खाल्लं की सकाळी पोटात गुडगुड? डाळ पचतच नाही? ३ टिप्स - पोटात गॅस होऊ नये म्हणून..

Avoid gas, bloating, cramping, and indigestion after eating pulses with these effective tips : चुकूनही 'या' ३ प्रकारच्या डाळी खाऊ नये..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 07:22 PM2024-10-24T19:22:55+5:302024-10-24T19:23:54+5:30

Avoid gas, bloating, cramping, and indigestion after eating pulses with these effective tips : चुकूनही 'या' ३ प्रकारच्या डाळी खाऊ नये..

Avoid gas, bloating, cramping, and indigestion after eating pulses with these effective tips | रात्री वरण खाल्लं की सकाळी पोटात गुडगुड? डाळ पचतच नाही? ३ टिप्स - पोटात गॅस होऊ नये म्हणून..

रात्री वरण खाल्लं की सकाळी पोटात गुडगुड? डाळ पचतच नाही? ३ टिप्स - पोटात गॅस होऊ नये म्हणून..

भारतीयांच्या आहारात कडधान्य असतेच (Pulses). भातासोबत वरण त्यावर तुपाची धार (Varan-Bhaat). वरण - भात खाल्ल्याने पोट तर भरतेच, शिवाय शरीराला पौष्टीक घटकही मिळतात (Health Benefits). कडधान्यांमध्ये भरपूर पोषण असते. डाळींमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

परंतु अनेकदा डाळी खाल्ल्यानंतर गॅस आणि ब्लोटिंगचा (Gas and Bloating) त्रास होतो. अशा लोकांना डाळी न खाण्याचा सल्ला मिळतो. डाळींमध्ये काही घटक असतात ज्यामुळे पचनास त्रास होतो. त्यामुळे काही लोक डाळी खाणं टाळतात, किंवा कमी प्रमाणात खातात. जर आपल्याला डाळी खाल्ल्यानंतर पोटात गॅस होण्याचा त्रास होत असेल तर, काही डाळी आजपासून खाणं बंद करा(Avoid gas, bloating, cramping, and indigestion after eating pulses with these effective tips).

उडीद डाळ

उडीद डाळ प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असते. ज्यामुळे पोटात गॅस आणि फुगण्याची समस्या निर्माण होते. उडीद डाळ पचायला जड असते. ज्यामुळे पचनसंस्थेत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ज्यांची पचनसंस्था कमकुवत असेल त्यांनी, उडीद डाळ कमी प्रमाणात खावे.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

चणा डाळ

ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, त्यांनी चणा डाळ खाऊ नये. त्यात जास्त प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे गॅस होतो. जास्त प्रमाणात चणे खाल्ल्याने पचन आणि पोट फुगण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर आपण चणा डाळ खात असाल तर, शिजवण्याआधी काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. जेणेकरून चणा डाळ पचायला सोपी होईल.

मसूर डाळ

काही लोकांना मसूर डाळ खाल्ल्यानंतरही पोट फुग्ण्याची समस्या होते. ज्यामुळे गॅस आणि इतर पचन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मसूर डाळ खाताना, मर्यादित प्रमाणात खावे.

गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून..

- बहुतांश डाळींमध्ये फायटिक ॲसिड आणि इतर घटक असतात ज्यामुळे पोटात गॅस होऊ शकतो. डाळी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्याने हे घटक कमी होतात. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येत नाही.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

- हिंग हे पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. डाळी शिजत घालताना त्यात हिंग घाला. यामुळे गॅसेसचा त्रास होणार नाही.

- गॅसची समस्या टाळण्यासाठी डाळी मर्यादित प्रमाणात खा. एकाच वेळी खूप कडधान्ये खाणे टाळा, अन्यथा पोटाला त्रास होऊ शकतो. 

Web Title: Avoid gas, bloating, cramping, and indigestion after eating pulses with these effective tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.