पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते (Drinking Water). त्वचा, डोळे, केस आणि शरीर या सर्व महत्त्वाच्या कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे (Health Tips). शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून तज्ज्ञ पाणी पिण्य़ाचा सल्ला देतात. पण पाणी पिण्याची देखील ठराविक वेळ असते. पाणी पिताना आपल्याकडून बरेच नकळत चुका घडतात. ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
आपल्या शरीरात सुमारे ६५ टक्के पाणी असते. हे प्रमाण वय, लिंग, उंची, वजन आणि शारीरिक हालचालींनुसार बदलते. त्यामुळे पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? कोणत्या गोष्टी टाळाव्या? पाहा(Avoid These 3 Common Mistakes While Drinking Water).
अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा
बहुतांश लोक अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात. परंतु याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटाचे विकारही वाढतात. अन्न व्यवस्थित पचत नाही. अशावेळी पचन नीट न झाल्याने शरीराला पोषक तत्वे पूर्णपणे मिळत नाही.
अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..
उभं राहून पाणी पिणे
वडीलधाऱ्यांनी आपल्याला उभं राहून पाणी पिणे म्हणजे आरोग्यासाठी घातक असा सल्ला नक्कीच दिला असेल. यामुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होतोच पण नसांवरही ताण पडतो. ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. यासोबतच किडनी आणि फुफ्फुसावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे नेहमी बसून पाणी प्यावे.
तिशीतच हाडं ठणकायला लागली? २ पालेभाज्या खा; मिळेल कॅल्शियम भरपूर-हाडं होतील मजबूत
एकाच वेळी भरपूर पाणी पिणे
उत्तम आरोग्यासाठी पाणी पिणे आवश्यक. परंतु, एकाच वेळी भरपूर पाणी प्यायल्याने नुकसान देखील होऊ शकते. एकाच वेळी पाणी प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलित होते. ज्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि मळमळ होऊ शकते.