Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो? अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, त्रास राहील आटोक्यात...

सतत कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो? अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, त्रास राहील आटोक्यात...

Avoid These 3 Foods For Constipation : कॉन्स्टीपेशनचा त्रास होऊ नये म्हणून आहारात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या याविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2023 05:22 PM2023-02-06T17:22:13+5:302023-02-06T17:30:17+5:30

Avoid These 3 Foods For Constipation : कॉन्स्टीपेशनचा त्रास होऊ नये म्हणून आहारात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या याविषयी

Avoid These 3 Foods For Constipation : Suffering from constant constipation? Don't eat 3 foods at all, trouble will stay under control... | सतत कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो? अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, त्रास राहील आटोक्यात...

सतत कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो? अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, त्रास राहील आटोक्यात...

कॉन्स्टीपेशन ही सध्या अनेकांना भेडसावणारी एक अतिशय सामान्य समस्या आहे. बैठं काम, व्यायामाचा अभाव, पाणी कमी पिणे, आहाराच्या चुकीच्या पद्धती यामुळे कोठा जड होतो आणि पोट साफ व्हायला त्रास होतो. पोट वेळच्या वेळी नीट साफ झाले नाही की आपल्याला एकप्रकारची अस्वस्थता येते आणि त्याचा आपल्या दैनंदिन कामांवर परीणाम होतो. कॉन्स्टीपेशन झालं की आपण केळं खाऊन किंवा कोमट पाणी आणि तूप घेऊन कोठा साफ कसा करता येईल यासाठी प्रयत्न करतो. त्याचाही काही उपयोग झाला नाही तर आपण डॉक्टरांकडून काही लॅक्सिटीव्ह औषधे घेतो (Avoid These 3 Foods For Constipation). 

पोट साफ होण्यासाठी ज्याप्रमाणे काही पदार्थ उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे काही पदार्थ हे कॉन्स्टीपेशनसाठी कारणीभूत ठरणारे असू शकतात. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी यासंदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. कॉन्स्टीपेशनचा त्रास होऊ नये म्हणून आहारात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या याविषयी... 

१. जीरे

आयुर्वेदात जिऱ्याला जीरका म्हणतात. तर जीरका म्हणजे ‘जे पचते’.हे पित्त वाढवते (पचन सुधारते), लघू (पचनास हलके) पण रुक्ष (प्रकृतीमध्ये कोरडे) आणि ग्रही (शोषून घेते) म्हणून ते भूक, अतिसार, आयबीएससाठी आश्चर्यकारक आहे परंतु बद्धकोष्ठतेसाठी नाही. त्यामुळे जीरं पचनाच्या इतर तक्रारींसाठी उपयुक्त असले तरी बद्धकोष्ठतेसाठी मात्र जीरं फायदेशीर नसते. 


२. दही 

दही रुच्य (चव सुधारते), उष्ण आणि वातजित (वात संतुलित करते) पण ते गुरू (पचायला जड) आणि ग्रही (जिर्‍याप्रमाणेच शोषणारे) आहे ज्यामुळे ते बद्धकोष्ठतेसाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर आराम होईपर्यंत दही टाळा.

३. कॅफेन

कॅफीन आपल्या पचनसंस्थेतील स्नायूंना उत्तेजित करू शकते आणि त्यामुळे आतड्याची हालचाल सोपी होते असा आपला समज असतो. परंतु कॅफीन निर्जलीकरणास कारणीभूत ठरते, ज्यामुळे उलट परिणाम होऊ शकतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर ते टाळा. तुमच्या दिवसाची सुरुवात कधीही चहा/कॉफीने करू नका. तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर दिवसाची सुरुवात कोमट पाणी किंवा एक चमचा गाईच्या तूपाने करा.
 

Web Title: Avoid These 3 Foods For Constipation : Suffering from constant constipation? Don't eat 3 foods at all, trouble will stay under control...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.