डायबिटीस कधी, कोणाला, केव्हा होईल सांगता येत नाही. याची लक्षणे देखील लवकर कळून येत नाही. डायबिटीस हा गंभीर आजार अनेक कारणांमुळे होतो. जर वेळीच यावर लक्ष नाही दिले, तर या आजारामुळे इतरही आजार आपल्याला छळू शकतात. डायबिटीसग्रस्त रुग्णांना दररोज औषधे खावे लागतात. जर नुकतंच डायबिटीस हा आजार निदान झालं असेल तर, आहारात काही बदल करून आपण रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवू शकता. शिवाय लाईफस्टाईलमध्ये देखील काही सकारात्मक बदल करणं गरजेचं आहे(Avoid These 5 Common Mistakes To Prevent Blood Sugar Spikes).
आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसरनुसार, 'डायबिटीस निदान झाल्यानंतर आहारात काही आवश्यक बदल करणं गरजेचं आहे. शिवाय बिघडलेल्या जीवनशैलीत सुधार आणून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. डायबिटीस हा आजार रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे होतो. याला मुख्य कारण बिघडलेली जीवनशैली ठरते. जर ब्लड शुगर नियंत्रित राहावे असे वाटत असेल तर, आजपासून लाईफस्टाईमध्ये ५ सकारात्मक बदल करा.'
सुस्त जीवनशैली सोडा, अॅक्टिव्ह बना
बैठी जीवनशैलीमुळे वजन तर वाढतेच, शिवाय इतर गंभीर आजारही निर्माण होतात. काही वेळेला रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. अशावेळी नियमित ४० मिनिटांचा व्यायाम करायलाच हवा. शिवाय योगभ्यास करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहते. शिवाय शरीरातील प्रत्येक पेशीला पुरेसा ऑक्सिजन मिळते. यासह यकृत डिटॉक्सिफाय होते आणि योग्य इन्शुलिन स्राव होण्यास मदत होते.
पोटात सतत गुडगुड होत असेल, पोट फुगत असेल तर ५ पदार्थ खाणं आजपासूनच बंद करा..
साखर, मैदा, दही आणि ग्लूटेनयुक्त पदार्थ खाणं टाळा
साखर, दही, मैदा आणि गव्हापासून तयार पदार्थ डायबिटिजग्रस्त रुग्णांना टाळण्यास सांगतात. या पदार्थांमुळे आपले आरोग्य आणखी बिघडू शकते. त्याऐवजी फळे खा. तसेच गाईचे दूध आणि तुपाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. गहू टाळून ज्वारी, नाचणी, राजगिरापासून तयार चपात्या खा.
रात्री उशिरा जेवण टाळा
सध्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वेळेवर जेवण करायला मिळत नाही. बरेच जण रात्रीचं उशिरा जेवतात. वेळेवर जेवण न केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत रोगाचा धोका कमी करायचं असेल तर, सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण करा. निदान ८ वाजेच्या आधी जेवण करा.
फक्त १० रुपयांचे फुटाणे खा, प्रोटीन आणि फायबर मिळेल भरपूर, वजनही घटेल लवकर
जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका
ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा धोका जास्त आहे, त्यांनी दिवसा झोपू नये. दिवसा झोपल्याने शरीरात कफ दोष वाढतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. रात्री देखील जेवल्यानंतर लगेच झोपू नये. रात्री जेवण केल्यानंतर निदान २५ मिनिटांसाठी शतपावली करावी. जेवणाच्या ३ तासानंतर आपण झोपू शकता.
औषधांसह आहार विहार महत्त्वाचा
निरोगी दिनचर्या न पाळणे आणि केवळ मधुमेहावरील औषधांवर अवलंबून राहणे, हे आरोग्याच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे यकृत आणि किडनी खराब होऊ शकते. शिवाय हृदयाच्या संबंधित आहाराचा धोका वाढू शकतो.