काही काही पदार्थ असे असतात जे कितीही पौष्टिक असले तरी ते रात्रीच्या जेवणात घेणं पुर्णपणे टाळलं पाहिजे. कारण रात्रीच्या जेवणानंतर शारिरीक हालचाली कमी होतात. यामुळे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही. यामुळे मग अनेक जणांना दुसऱ्यादिवशी सकाळी ॲसिडिटी, पोट फुगणे, गॅसेस होणे, पोट व्यवस्थित साफ न होणे, असा त्रास होतो (Avoid these 5 food in dinner). त्यामुळे काही पदार्थ रात्रीच्यावेळी खाणं पुर्णपणे टाळलंच पाहिजे (what should we eat in dinner). हे पदार्थ नेमके कोणते याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती बघा...(which food you must not eat in dinner according to Ayurveda)
रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ खाऊ नये?
रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ घेणे टाळावे, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी kshitija.bhosale.351 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्या असं म्हणतात की जे पदार्थ वातूळ असतात, असे पदार्थही रात्रीच्या जेवणात घेऊ नये. यामुळे शरीरात वात निर्माण होतो, कफ, पित्त असाही त्रास होतो.
तसेच वजन आणि कोलेस्ट्राॅलही वाढते. तसेच आरोग्यावर इतरही अनेक दुष्परिणाम होत असतात. हे पदार्थ नेमके कोणते ते पाहा.
१. यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे दही किंवा ताक. यामुळे अनेकजणांना कफ, पित्त वाढणे असा त्रास होतो.
२. रात्री साधारणपणे ७ वाजेच्या नंतर कोणतंही फळ खाणं टाळावं. तसेच फळांचा रसही घेऊ नये. यामुळेही कफ आणि पित्तविकार होण्याचा त्रास वाढतो. लिंबूवर्गीय फळं असतील तर ॲसिडिटही होऊ शकते.
३. मैद्याचे पदार्थही रात्रीच्या जेवणात घेऊ नये. कारण ते पचायला जड असतात. गव्हाची पोळीही शक्यतो रात्री खाऊ नये. याऐवजी भाकरी किंवा मिश्र धान्यांचे थालिपीठ, पराठा खाण्यास प्राधान्य द्यावे.
एका दिवशी जास्तीतजास्त किती साखर खावी? आहारतज्ज्ञ सांगतात- साखर सोडणं कठीण वाटत असेल तर...
४. कच्ची मोड आलेली कडधान्येही पचायला जड असतात. शिवाय ती वातूळ असतात. त्यामुळे ते टाळावे. तसेच सलाड खाणंही टाळावं.
५. आयुर्वेदानुसार पालेभाज्या वातुळ प्रकारातल्या असतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणात त्या टाळाव्या. त्यामुळे वात होणे, संधीवात, पोटदुखी असा त्रास होऊ शकतो.