Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर ३ गोष्टी खाणं टाळा, आरोग्यासाठी अपायकारक कारण..

मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर ३ गोष्टी खाणं टाळा, आरोग्यासाठी अपायकारक कारण..

Avoid these things after eating sprouted Black Chana नियमित मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर शरीराला उर्जा मिळते, यासह वजन देखील कमी होते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2023 01:20 PM2023-09-03T13:20:48+5:302023-09-03T13:21:58+5:30

Avoid these things after eating sprouted Black Chana नियमित मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर शरीराला उर्जा मिळते, यासह वजन देखील कमी होते..

Avoid these things after eating sprouted Black Chana | मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर ३ गोष्टी खाणं टाळा, आरोग्यासाठी अपायकारक कारण..

मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर ३ गोष्टी खाणं टाळा, आरोग्यासाठी अपायकारक कारण..

उत्तम आरोग्यासाठी आहारात कडधान्यांचा समावेश असावा असे तज्ज्ञ सांगतात. मुग, मटकी, चणे भिजवून खावे. मोड आलेले कडधान्य चवीला उत्कृष्ट तर लागतातच, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. सकाळी मुठभर मोड आलेले चणे खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा तर दूर होतोच, यासह अनेक आजारांपासूनही बचाव होतो. मोड आलेल्या काळ्या चण्यांमध्ये कॅल्शियम, प्रथिने, लोह, फायबर आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्वे आढळतात. पण मोड आलेले काळे चणे खाण्याची देखील पद्धत आहे. मोड आलेले चणे खाल्ल्यानंतर लगेच काही गोष्टींचे सेवन करणे टाळावे(Avoid these things after eating sprouted Black Chana).

यासंदर्भात, आरोग्य हेल्थ सेंटरचे क्लिनिकल डायटीशियन डॉ. व्ही.डी. त्रिपाठी सांगतात, 'जे लोक नियमित मोड आलेले चणे खातात, त्यांना रोगांचा धोका कमी असतो. परंतु चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास इतर गंभीर आजार छळू शकतात. चुकीच्या पद्धतीने मोड आलेले चणे खाल्ल्याने पोट आणि पचनाशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.'

मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाणं टाळावे

दूध

मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे टाळावे. दूध आणि काळे चणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे टाळावे. यामुळे त्वचेच्या निगडीत समस्या होण्याचा धोका वाढतो. यासह चेहऱ्यावर पांढरे डाग उठण्याची समस्या वाढते.

व्यायाम - डाएट करूनही तिशीनंतर वजन कमी का होत नाही? ५ कारणं, वेळीच बदला नाहीतर..

लोणचे

मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर किंवा त्यासोबत लोणचं खाऊ नये. लोणच्यामध्ये आम्ल असते. त्यामुळे मोड आलेले चणे खाल्ल्यानंतर लोणचं खाल्ल्यास, पोटात आम्ल तयार होते. यामुळे पोटाच्या निगडीत त्रास वाढतो.

कारले

मोड आलेले चणे खाल्ल्यानंतर कारलं खाणं टाळावं. मोड आलेले चणे आणि कारल्यामध्ये ऑक्साईड आढळते. मोड आलेले चणे आणि कारले एकत्र खाल्ल्याने पोटात रिएक्शन तयार होऊ शकते. त्यामुळे शरीरात विविध आजार निर्माण होऊ शकतात.

झटपट वजन कमी करायचंय? ५ गोष्टी करा - जिम लावायची गरज नाही इतका वाढेल फिटनेस

मोड आलेले चणे खाण्याचे फायदे

सकाळी मोड आलेले काळे चणे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, यासह शरीराला उर्जा मिळते. यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, व्हिटॅमिन बी आणि अँटी-ऑक्सिडंट्स सारखे गुणधर्म आढळतात. याचे नियमित सेवन केल्याने शरीर निरोगी राहते.

Web Title: Avoid these things after eating sprouted Black Chana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.