Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मधुमेह, बीपी, कॅन्सर हे आजार ऐन तारुण्यातच आपल्याला गाठू नये म्हणून काय करायचं? तज्ज्ञ सांगतात..

मधुमेह, बीपी, कॅन्सर हे आजार ऐन तारुण्यातच आपल्याला गाठू नये म्हणून काय करायचं? तज्ज्ञ सांगतात..

Health Tips: डायबिटीज, रक्तदाब, कॅन्सर असे अनेक आजार कमी वयातच होण्याचा धोका वाढला आहे. म्हणूनच या आजारांपासून दूर राहायचं तर आहारातील एक पदार्थ कमी करा, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 05:15 PM2022-12-28T17:15:19+5:302022-12-28T18:53:23+5:30

Health Tips: डायबिटीज, रक्तदाब, कॅन्सर असे अनेक आजार कमी वयातच होण्याचा धोका वाढला आहे. म्हणूनच या आजारांपासून दूर राहायचं तर आहारातील एक पदार्थ कमी करा, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

Avoid this one food item to stay away from the diseases like diabetes, blood pressure, cancer at early age | मधुमेह, बीपी, कॅन्सर हे आजार ऐन तारुण्यातच आपल्याला गाठू नये म्हणून काय करायचं? तज्ज्ञ सांगतात..

मधुमेह, बीपी, कॅन्सर हे आजार ऐन तारुण्यातच आपल्याला गाठू नये म्हणून काय करायचं? तज्ज्ञ सांगतात..

Highlightsवय वाढले की हे आजार होतात, असा अगदी काही वर्षांपुर्वीपर्यंतचा आपला समज होता. पण आता मात्र कमी वयातच हे आजार मागे लागत आहेत.

पुर्वीच्या काळी वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडला की त्यानंतरच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सर असे आजार व्हायचे. त्यामुळे साधारण वय वाढले की हे आजार होतात, असा अगदी काही वर्षांपुर्वीपर्यंतचा आपला समज होता. पण आता मात्र कमी वयातच हे आजार मागे लागत आहेत. अवघ्या तिशी- पस्तीशीतील तरुणांना मधुमेह, हृदयविकार, कर्करोग गाठत आहे. म्हणूनच हे आजार होऊ नयेत, यासाठी आता अगदी कमी वयापासूनच आहाराची काही पथ्ये पाळणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही माहिती. (How to control diabetes, blood pressure, cancer at early age)

आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, लिव्हरच्या अनेक तक्रारी असे आजार ज्या लोकांना आहेत, त्या बहुतांश लोकांच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते, असे आढळून आले आहे.

तळपाय- टाचा रात्री खूप ठणकतात? करिना- आलियाची फिटनेस ट्रेनर सांगतेय ३ सोपे व्यायाम 

जेवढ्या जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स घेतले जातात, तेवढ्या जास्त प्रमाणात शरीरात इन्सुलिन तयार होतं. इन्सुलिनला एजिंग हार्मोन म्हणून ओळखलं जातं. शरीरात इन्सुलिन जेव्हा जास्त प्रमाणात तयार होतं, तेव्हा ते मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रियेवर परिणाम करतं. 

 

इन्सुलिनचं शरीरातील प्रमाण वाढलं तर शरीरात असणाऱ्या इतर हार्मोन्सचे एकमेकांसोबतचे संतुलन बिघडविण्यासाठीही इन्सुलिन कारणीभूत ठरतं.

करिश्मा कपूरचा सुपरकुल मिडी ड्रेस, थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी ठरू शकतो परफेक्ट... बघा ड्रेसची किंमत

त्यामुळे हे सर्व आजार नियंत्रणात ठेवायचे असतील किंवा कमी वयातच हे आजार आपल्यामागे लागू नये, असं वाटत असेल तर अगदी आतापासूनच कार्बोहायड्रेट्सचे सेवन नियंत्रित ठेवावे, असा सल्ला डॉ. मंजिरी यांनी दिला आहे. याविषयी डॉ. मंजिरी यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://www.facebook.com/reel/2311110182381758

 

Web Title: Avoid this one food item to stay away from the diseases like diabetes, blood pressure, cancer at early age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.