Join us   

जवळचं धुरकट दिसतं-दृष्टी कमजोर झाली? डॉक्टर सांगतात खास उपाय, जुनाट चश्म्याचा नंबर होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 9:02 PM

5 Tips And Foods That Can Increase Eye Power Naturally : आयुर्वेदात डोळ्यांच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी गाजर उत्तम मानले जाते. गाजरामुळे शरीराला पोषण मिळते.

दीर्घकाळ स्क्रिनसमोर बसणं हे खूपच कॉमन झालं आहे. वाढत्या कामाच्या ताणामुळे लोक तासनतास कंम्प्यूटर आणि मोबाईल पाहत राहतात ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर जोर पडतो. (Eye Care Tips) जर मध्ये मध्ये तुम्ही डोळ्यांना आराम दिला नाही किंवा स्क्रिन टाईम कमी केला नाही तर डोळ्यांशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. जसं की कंम्प्यूटर व्हिजन सिंड्रोम किंवा ब्लर दिसणं याचा तुमचा कामावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. (5 Tips And Foods That Can Increase Eye Power Naturally)

आयुर्वेदीक क्लिनिकचे डायरेक्टर कपिल त्यागी सांगतात की, आयुर्वेदात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. जसं की डोळ्यांचे व्यायाम, बॅलेन्स डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये बदल. जास्तीत जास्त लोक नजर कमजोर झाल्यानंतर चष्मा किंवा औषधांचा आधार घेतात पण आयुर्वेद डोळ्यांच्या समस्यांवरील उपायांवर अधिक लक्ष देते. शरीरात वात, पित्त आणि कफ हे दोष संतुलित करून डोळ्यांच्या आरोग्यात सुधारणा करता येऊ शकते. आयुर्वेदीक पद्धतीनं डोळ्यांची काळजी कशी घ्यायची ते समजून घेऊ.

व्यायाम न करता वजन कमी कसं करायचं? आहारतज्ज्ञांनी सांगितलं सिक्रेट, सुटलेलं पोटही गायब

आयुर्वेदात डोळ्यांची देखभाल करण्यासाठी पित्त दोषाचे  संतुलन ठेवणं खूपच गरजेचं आहे. पित्त दोषाचा संबंध दृष्टी, पचनक्रिया, शरीराच्या तापमानाशी असतो. जर पित्त दोष वाढला तर डोळे सुकणं, प्रकाशाप्रती संवेदनशील असणं या समस्या उद्भवू शकतात. यासाठी पित्त दोष संतुलित ठेवणं गरजेचं आहे. यासाठी वेळोवेळी आयुर्वेदीक चिकित्सकांचा सल्ला घेत राहायला हवा.

डोळ्यांचे व्यायाम

आयुर्वेदात डोळ्यांचे व्यायाम दृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळ्यांच्या मांसपेशींमध्ये ब्लड फ्लो सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी तुम्ही काही सोपे  व्यायाम प्रकार करू शकता. 

पामिंग : हा व्यायाम करण्यासाठी आपले हात एकमेकांना रगडा जेणेकरून गरम राहतील नंतर हात बंद उघडून डोळ्यांवर ठेवा. काही मिनिट आरामानं बसा  नंतर दीर्घ श्वास घ्या. हा व्यायाम केल्यानं डोळ्यांचा ताण-तणाव दूर होईल आणि डोळ्यांना आराम मिळेल.

ब्लिंकिंग व्यायाम

हा व्यायाम केल्यानं डोळे साफ आणि मॉईश्चराईज राहतात आणि व्यवस्थित काम करतात. डोळ्यांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हे व्यायाम करायला हवेत.

फोकस शिफ्टिंग- डोळ्यांची लवचीकता वाढवण्यासाठी काही सेकंदांसाठी दूर ठेवलेल्या वस्तूवर लक्ष केंद्रीत करा. नंतर कोणत्याही जवळच्या वस्तूवर लक्ष द्या. हा व्यायाम केल्यानं डोळ्यांना आराम मिळेल आणि एकाग्रता वाढेल.

पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खमंग रेसिपी, चिवडा होईल कुरकुरीत-पावसाळी हवेतही सादळणार नाही

गाजर

आयुर्वेदात डोळ्यांच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी गाजर उत्तम मानले जाते. गाजरामुळे शरीराला पोषण मिळते. काही खाद्यपदार्थ शरीरासाठी उत्तम मानल जातात कारण  त्यामुळे शरीर मजबूत होते आणि पित्त दोष संतुलित होण्यास मदत होते. गाजर आणि हिरव्या पालेभाज्या याचे उत्तम उदाहरण आहेत. व्हिटामीन ए आणि बीटा कॅरोटीनचा चांगला स्त्रोत आहे. व्हिटामीन ए मुळे पाहण्याची क्षमता वाढते आणि बीटा कॅरोटीन डोळ्यांचा कमकुवतपणा रोखण्यास प्रभावी ठरते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल