कॅल्शियम (Calcium) हाडांच्या मजबूतीसाठी फार आवश्यक असते. कॅल्शियमची कमतरता पूर्ण न झाल्यास हाडं कमकुवत होऊ शकतात. यासाठी दुध सोडून इतर काही पदार्थांचे सेवन तुम्ही करू शकता. कॅल्शियम एक असा घटक आहे ज्यामुळे फक्त दात मजबूत होत नाहीत तर मांसपेशी आणि नसांचे कामकाजही चांगले राहते. आयुर्वेदीक डॉ. रोबिन सिंह सांगतात की दुधापेक्षा जास्त कॅल्शियम कशातून मिळते. (Ayurved Dr Told 5 Foods That Have More Calcium Than Milk To Make Bones Strong And Healthy)
1) चिया सिड्स
हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार चिया सिड्स कॅल्शियम आणि प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. याशिवाय यात ओमेगा ३ फॅटी एसिड्ससुद्धा असतात. चिया सिड्समुळे फायबर्स इन्टेक वाढतो. चिया सिड्समधून ९.८ ग्रॅम डायटरी फायबर्स असतात. चिया सिड्समुळे ब्लड प्रेशर कमी होते, कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहतो, डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली राहते, वजन कमी होण्यात अडथळे येत नाहीत. डायबिटीस नियंत्रणात राहतो.
पोटाचे टायर्स सुटलेत-कंबर लठ्ठ दिसते? २१ दिवस हे पदार्थ खा, वितळेल चरबी-फिट दिसाल
2) राजगिरा
राजगिऱ्याचा हेल्दी फूड्समध्ये समावेश होतो. यामुळे हाडांना फक्त कॅल्शियम मिळत नाही तर आयर्नसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ मल्टीडिसिप्लिनरीच्या रिपोर्टनुसार यात पोषक तत्व असतात ज्यामुळे हेअर फॉलची समस्या उद्भवत नाही. यात फायबर्स व्हिटामीन्स भरपूर असतात. ज्यामुळे केस सुंदर आणि दाट होण्यास मदत होते.
3) भोपळ्याच्या बीया
एक ते दोन चमचे भोपळ्याच्या बियांमध्ये जवळपास दुधाइतकेच कॅल्शियम असते. रात्रभर पाण्यात भिजवून या बियांचे सेवन केल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.
पोटाचे टायर्स सुटलेत-कंबर लठ्ठ दिसते? २१ दिवस हे पदार्थ खा, वितळेल चरबी-फिट दिसाल
4) शेवग्याची पानं
शेवग्याच्या पानांची पावडर दुधात घालून प्यायल्यास यातून चारपट जास्त कॅल्शियम मिळते. याशिवाय यात दुधापेक्षा जास्त प्रोटीन असते. मोरींगा व्हिटामीन्स, मिनरल्स, पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे. यात कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, अमिनो एसिड असते ज्यामुळे शरीरात मसल्स बिल्ड होण्यास मदत होते.