Join us   

अंथरुणावर पडल्या पडल्या शांत झोप लागेल,जेवणानंतर करा ५ गोष्टी! सकाळी पोटही होईल साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 11:57 AM

5 Post dinner practices to improve digestion and induce sleep : शांत झोप लागणं आणि पोट साफ होणं उत्तम आरोग्यासाठी गरजेचं आहे.

रात्रीची झोप आपल्या चांगल्या आरोग्यासाठी  अत्यंत महत्वाची असते.  चांगली झोप  झाली नसेल तर दिवसभर थकवा जाणवतो. हेल्दी खाणं आणि व्यायाम याचबरोबर चांगली झोपही थकवा, अशक्तपणा दूर करण्यात मदत करते. जर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नसेल किंवा पचनाचे त्रास उद्भवत असतील तर रात्री जेवल्यानंतर सोपे उपाय करून तुम्ही चांगली झोप मिळवू शकता. (Ayurveda doctor shared 7 post dinner practices to improve digestion and induce sleep naturally)

आयुर्वेद डॉ. वरलक्ष्मी, आयुर्वेदीक डॉक्टर आणि वेलनेस कोच यांनी अलिकडेच इंस्टाग्रामवर पोस्टवर उत्तम पचन  आणि झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी काही सवयी शेअर केल्या आहेत. या सवयींना रोजच्या जीवनात आणल्यास सकाळी उठल्यानंतर उद्भवणारे पचनाचे विकार दूर राहतील. (5 Post dinner practices to improve digestion and induce sleep)

 

 

जेवणानंतर हात साबणानं स्वच्छ धुवा

सध्या टिश्यूपेपरच्या जमान्यात लोक हात धुण्याकडे बरेचदा दुर्लक्ष करतात. आयुर्वेद तज्ज्ञांच्यामते हात पाण्यानं स्वच्छ धुणं फायदेशीर ठरतं.  घाणेरडे हात इन्फेक्शन किंवा पोट दुखीचं कारण ठरू शकतात. 

रात्री जेवणच केलं नाही तर खरंच वजन झटकन कमी होते का? तज्ज्ञ सांगतात, फिटनेस हवा तर..

खाल्ल्यानंतर दात व्यवस्थित स्वच्छ करा.

जेवल्यानंतर दातात अन्नाचे तुकडे अडकलेले असतात.  हे कण असेच सोडले तर दात आणि तोंडातून दुर्गंधी येते. म्हणूनच जेवल्यानंतर ब्रश करा आणि कोमट  पाण्यानं गुळण्या करा. ओरल हेल्थ आतड्यांसह इतर अवयवांनाही प्रभावित करते. म्हणून पाणी पिण्याकडे विशेष लक्ष ठेवा.

नेत्र स्पर्श

आयुर्वेदात  रात्रीच्या जेवणानंतर तेजोमय/ अग्नि तत्वाच्या स्त्रोतानं डोळ्यांना हातानं स्पर्श करण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्यानं डोळे चांगले राहतात याशिवाय झोपही चांगली लागते. 

जेवल्यानंतर बडिशेप खा

जेवल्यानंतर बडिशेप किंवा बियांचे मिश्रण खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली राहते. तोंडाला दुर्गंधी येत नाही. म्हणूनच एक्सपर्ट्स रात्रीच्या जेवणानंतर बडिशेप खाण्याचा सल्ला देतात.

रात्री चालायला जा

जेवण झाल्यावर लगेच बसू नये किंवा झोपू नये. हे तुम्ही ऐकलंच असेल. जेवल्यानंतर फेरफटका मार. असे केल्याने चयापचय वाढते तसेच अन्न पचण्याची प्रक्रियाही गतिमान होते. तज्ज्ञ जेवणानंतर 100 पावले हळू चालण्याची शिफारस करतात.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स