एसिडीटीची समस्या सध्या खूपच कॉमन झालीये. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यस्त जीवनशैली याचं सगळ्यात मोठं कारण आहेत. मसालेदार पदार्थ आणि तेलयुक्त पदार्थांच्या सेवनानं हा त्रास वाढतो छातीत जळजळ, कॉन्स्टीपेशन थकवा जाणवतो. (Ayurveda doctor told 3 effective home remedies to get rid of acidity gerd acid reflux and heartburn)
एसिडीटीची कारणं काय आहेत
डॉक्टर सांगतात जे लोक आपल्या भूकेचं प्रमाण, जेवणाची गुणवत्ता यांचा विचार न करता खातात. त्यांच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो आणि एसिडिटीची समस्या वाढते. वयस्कर व्यक्तीचं नाही तर तरूण आणि लहान मुलांनाही हा त्रास जाणवतो.
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पित्त वाढतं. ज्याला सामान्य भाषेत गॅस्ट्रिक ज्यूस असंही म्हणतात. यामुळे जेवण पचत नाही. असं झाल्यानं जळजळ, आंबट ढेकर, अन्न गिळायला त्रास होणं, उलटी येणं अशी लक्षणं जाणवतात. आयुर्वेदक डॉक्टरांनी एसिडीटीपासून बचावाचे ३ उपाय सांगितले आहेत.
धन्यांचं पाणी प्या
१) कोथिंबिरीचा चहा बनवण्यासाठी 1 ग्लास पाणी (300 मिली) घ्या, त्यात 1 टेबलस्पून कोथिंबीर, 5 पुदिन्याची पाने आणि 15 कढीपत्ता घाला आणि 5 मिनिटे उकळा, नंतर गाळून हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.
२) प्रत्येक जेवणानंतर 1 चमचे बडीशेप खा. बडीशेप चावून आम्लता कमी करू शकता. अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही एका कप पाण्यात बडीशेप उकळून त्याचा काढा बनवून प्या. बडीशेपेच्या बियांमध्ये आढळणारे तेल पचनास मदत करते आणि जळजळ कमी करते.
३) एक कप पाणी घ्या आणि ते 3 मिनिटे उकळवा, नंतर त्यात वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि 5 मिनिटे उकळून घ्या, नंतर रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी गुलाब चहा फिल्टर करा आणि प्या.